शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पोलिसांची मेहेरनजर

By admin | Updated: August 28, 2016 04:17 IST

विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नावाचे बॅनर लावून दहीहंडी फोडली. २० फुटांपेक्षा अधिक उंचीवर दहीहंडी नसावी, असे न्यायालयाचे आदेश असताना, पिंपरी-चिंचवडमध्ये

पिंपरी : विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नावाचे बॅनर लावून दहीहंडी फोडली. २० फुटांपेक्षा अधिक उंचीवर दहीहंडी नसावी, असे न्यायालयाचे आदेश असताना, पिंपरी-चिंचवडमध्ये बहुतांशी ठिकाणी पाच ते सहा थर रचून दहीहंडी फोडल्याचे दिसून आले. नियमांचे पालन करणाऱ्या काही मंडळांचा अपवाद वगळता नियमांचे उल्लंघन करून दहीहंडी फोडणाऱ्या अनेक मंडळांपैकी एकाही मंडळांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. पुणे शहर व परिसरात मात्र २५ मंडळांवर गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे. महापालिका निवडणूक जवळ आल्याने यंदाच्या दहीहंडी उत्सवात राजकीय रंग असल्याने उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पोलिसांची मेहेरनजर असल्याचे जाणवले. दहीहंडी उत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये दोन डझनहून अधिक सिनेतारकांनी हजेरी लावली. दहीहंडीचा जल्लोष रात्री असला, तरी दुपारपासूनच पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत गटागटाने थांबलेले बाऊन्सर नागरिकांना दृष्टिपथास आले. दहीहंडी उत्सवाला सिनेतारका येणार असल्याने त्या त्या ठिकाणी बाऊन्सर तैनात करण्यात आले होते. दहीहंडी उत्सवानिमित्ताने गुरुवारी शहरात वेगळेच वातावरण होते. महापालिका निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांनी दहीहंडीच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शनच केले. वजनदार राजकीय नेते आधारस्तंभ असलेल्या मंडळांनी जल्लोष केला. एका ठिकाणी पाच ते सहा सिनेतारकांना निमंत्रित करून गोपाळ पथकांवर लाखो रुपये खर्च केला. दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईहून आलेल्या गोपाळ पथकांनी उंच असे सात थर रचून दहीहंडी फोडली. - न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन करून वीस फुटांपेक्षा जास्त उंचीचे थर रचणाऱ्या दहीहंडी उत्सव मंडळांवर गुन्हे दाखल झाले नाहीत. शिवाय, ध्वनिप्रदूषण, रहदारीस अडथळा ठरेल अशा पद्धतीने ज्या मंडळांनी मंडप उभारले होते, त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली नाही. पुण्यात मात्र ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर, तसेच रहदारीस अडथळा ठरेल, अशा पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनाही पुणे शहर पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवला आहे.