शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त ठेकेदारांना पीएमपीचा दणका

By admin | Updated: July 28, 2015 00:52 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाशी (पीएमपी) झालेल्या कराराचे पालन न करता बेशिस्तपणे बस मार्गावर आणणाऱ्या खासगी बस ठेकेदारांकडून दीड वर्षात तब्बल ११ कोटी ३२ लाख रुपयांचा

पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाशी (पीएमपी) झालेल्या कराराचे पालन न करता बेशिस्तपणे बस मार्गावर आणणाऱ्या खासगी बस ठेकेदारांकडून दीड वर्षात तब्बल ११ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दंड आकारूनही ठेकेदारांकडील बसबाबत वारंवार काही ना काही तक्रारी पीएमपीकडे येत आहेत.पीएमपीने खासगी ठेकेदारांशी भाडेतत्त्वावर बस चालविण्यासाठी करार केला आहे. त्यानुसार या ठेकेदारांकडून पीएमपीला बस पुरविल्या जातात. सध्या ६ ठेकेदारांच्या सुमारे ६६० बस मार्गावर धावत आहेत. या ठेकेदारांशी करार करताना त्यामध्ये काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटी व नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्याकडून त्यानुसार दंड आकारण्याचा अधिकार पीएमपीला आहे. त्यानुसार पीएमपीने ठेकेदारांकडून मे २०१५ अखेरपर्यंत सुमारे दीड वर्षात ११ कोटी ३२ लाख ४६ हजार ८७२ रुपयांचा दंड वसूल केल्याचे समोर आले आहे. हाय लाईट्स फोरमचे अध्यक्ष उमेश नाईक यांना माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मिळाली आहे. पीएमपीतील खासगी बस विभागाने ही माहिती दिली आहे.करारानुसार ठेकेदारांना नियमांचे पालन करून बस मार्गावर आणणे, तसेच प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची काळजी घेणे आवश्यक आहे. पण अनेकदा ठेकेदारांकडील बसच्या फेऱ्या रद्द केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. काही चालक गणवेश न घालताच बस मार्गावर आणतात. तर गर्दीच्यावेळी काही चालक बस थांब्यावर थांबवत नाहीत. ते सुसाट पुढे निघून जातात. याचा फटका प्रवाशांना बसतो. अनेकदा बसला मार्ग फलक लावले जात नाहीत. बस वेळेवर सोडल्या जात नाहीत. बाकडी फाटलेली असणे, तुटलेल्या अवस्थेतील खिडक्या अशा विविध कारणांमुळे कराराचा भंग होतो. त्यासाठी संबंधित बस ठेकेदारांना १०० रुपयांपासून पुढे बेशिस्तीनुसार दंड आकारला जातो, असे पीएमपीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)