शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून पाणी कपातीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 20:31 IST

पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणी कपातीचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत.

पिंपरी : पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणी कपातीचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत. गुरूवारी झालेल्या पाणीपुरवठा विभाग आणि गटनेत्यांच्या बैठकीत तूर्तास कपात करू नये, अशी आग्रही भूमिका लोकप्रतिनिधींनी मांडली. तर पाणी कपात करावीच लागेल, अशी भूमिका प्रशासनाने मांडली. त्यामुळे दिवसाआड की आठवड्यातून एकदा पाणी कपात याविषयी पुढील आठवड्यात निर्णय होणार आहे.     पिंपरी-चिंचवड महापालिका परिसराला पवना धरणातून पाणी पुरवठा होता. पाऊस लांबल्याने धरणातील पाणीसाठा ऐशी टक्यांवर आला आहे. त्यामुळे पाणी कपात करावी लागेल, असे प्रशासनाने सूचित केल्यानंतर आज पाणी पुरवठा विभाग आणि गटनेत्यांची बैठक झाली. यावेळी महापौर राहूल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत आदी उपस्थित होते. यावेळी पाणी कपात न करता पाण्याचे नियोजन करावे, अशी सूचना गटनेत्यांनी केली. महापौर म्हणाले, ‘‘धरणात पूरेसा साठा आहे. तूर्तास कोणत्याही प्रकारची पाणी कपात करू नये, पाणीपुरठयाचे योग्य नियोजन करून, यासंदर्भातील अहवाल, नियोजन आठ दिवसात तयार करावे, त्यानंतर बैठक होऊन यावर निर्णय घेण्यात येईल.’’ 

    सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘पाणी कपातीपेक्षा बचतीच्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना केल्या आहेत. सध्या धरणात ७९ टक्के पाणी साठा आहे. गेल्यावर्षी हा साठा ९० टक्के होता. प्रतिदिन ४४० एमएलडी पाणी उचलले तरी जून अखेरीपर्यंत पाणी पूरणार आहे. आठवड्यातून एक दिवस पाणी नाही, असे नियोजन केल्यास एकोणीस दिवस अधिकचे पाणी मिळू शकते. त्यामुळे आठवडाभरात सर्वपर्यांयांवर अभ्यास करून नियोजन सादर करावे. याबाबत पुन्हा चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.’’

    आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘धरणातील पाणी साठा पाहता, पाणी कपातीचे नियोजन करावे लागणार आहे. गेल्यावर्षीपेक्षा दहा टक्के साठा कमी आहे. तसेच जलसंपदा विभागाने ४८० ऐवजी ४४० एमएलडी पाणी उचलावे, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे कपातीचे नियोजन करणे गरजेचे आहे. कपातीच्या विषयावर आज चर्चा झाली. त्यावर आठवड्यातून एकदा पाणी कपात करायची की दिवसाआड पाणी द्यायचे याविषयी अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पBJPभाजपा