शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

Video : फटाका स्टॉलच्या मार्केटिंगसाठी गुन्हेगारी रील करणे तरूणाला भोवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 20:32 IST

- वाकड पोलिसांनी ‘खाक्या’ दाखवताच रिल्स बनवणाऱ्याने मागितली माफी 

पिंपरी : फटाका स्टॉलचे गुन्हेगारी स्टाईलने मार्केटींग करणे एका तरूणाला चांगलेच भोवले आहे. फटाक्यांच्या स्टॉलची प्रसिद्धी व्हावी, यासाठी तरूणाने टोळीयुद्धाचा बनावट प्रसंग साकारत गोळीबाराचे थरारक रील तयार केले. ही रील सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. थेरगाव येथे घडलेल्या या प्रकाराची वाकड पोलिसांनी गंभीर दखल घेत तरुणाला ताब्यात घेतले. त्यानंतर पुन्हा असे रील बनवणार नाही, असे म्हणत या तरुणाने माफी मागितली.

राकेश मराठे असे या रीलबहाद्दर तरूणाचे नाव आहे. राकेश याला रिल्स बनवण्याचा छंद आहे. राकेश याने काळेवाडी - थेरगाव रस्त्यावर फटाका स्टॉल टाकला आहे. फटाक्यांच्या स्टॉलची प्रसिद्धी व्हावी, यासाठी तरूणाने टोळीयुद्धाचा बनावट प्रसंग साकारत गोळीबाराचे थरारक रील तयार केले. ‘थेरगावमध्ये खुलेआम घडलेला प्रकार’ असे कॅप्शन देत त्याने रील बनवला. हातात प्लास्टिकचे पिस्तूल घेत चेहर्‍यावर गुंडांच्या थाटात भाव आणि त्यानंतर दुचाकीवरील तरूणावर बनावट गोळीबाराचे दृश्य बनवले आणि शेवटी फटाक्यांच्या स्टॉलचे नाव आणि पत्ता झळकवला. हे रील व्हायरल झाल्यानंतर त्यातील दृश्य पाहून नागरिकांनी ती खरी घटना समजून घेतली. त्यामुळे घबराट पसरली. सोशल मीडियावर या रीलविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.  

फटाक्यांची जाहिरात करायची तर करा, पण गुन्हेगारी दाखवून प्रचार करणे योग्य नाही, असा संताप व्यक्त करत या प्रकाराकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. त्यानुसार, वाकड पोलिसांनी मंगळवारी (दि. १४) सकाळीच या बहाद्दराचा शोध घेत त्याला पोलिस ठाण्यात आणले. पोलिसी खाक्या दाखवत त्याला समज दिली. त्यानंतर त्याने झाल्या प्रकाराबाबत माफी मागितली. तसेच, संबंधित रील डिलीट केले. त्याने माफी मागितल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. 

फटाक्याच्या स्टॉलची जाहिरात करण्यासाठी संबंधित तरुणाचे गुन्हेगारीचे उदात्तीकरण होईल, असे रील बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित तरुणाला पोलिस ठाण्यात आणले. त्याला समज देण्यात आली आहे. तरुणाने झाल्या प्रकाराबाबत माफी मागत रील डिलीट केले आहे. -  शत्रुघ्न माळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड 

English
हिंदी सारांश
Web Title : Youth's criminal reel for firecracker stall marketing backfires, apologizes.

Web Summary : A Pimpri youth's gangster-style firecracker stall ad reel sparked outrage. He staged a fake shooting, creating fear. Wakad police intervened, leading to an apology and deletion of the reel after public backlash.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी