रामनवमी मिरवणुकीत मल्लखांब प्रात्यक्षिकात दुर्घटना; तरुण आगप्रयोगात भाजला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:59 IST2025-04-08T15:54:12+5:302025-04-08T15:59:23+5:30
रामनवमी निमित्त तळेगाव दाभाडे येथे मिरवणूक काढण्यात आली

रामनवमी मिरवणुकीत मल्लखांब प्रात्यक्षिकात दुर्घटना; तरुण आगप्रयोगात भाजला
पिंपरी : रामनवमीनिमित्त तळेगाव दाभाडे येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मल्लखांब खेळत असताना त्यावर आगीसंबंधी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. हे प्रात्यक्षिक दाखवत असताना एक तरुण भाजला. ही घटना ६ एप्रिल रोजी सायंकाळी मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
सुरज सुरेश थोरात (२५, सोमाटणे, मावळ), शिवम सुधीर कसार (२०, कोथरूड, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार कृष्णा कातकडे यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनवमी निमित्त तळेगाव दाभाडे येथे मिरवणूक काढण्यात आली.
रामनवमी मिरवणुकीत मल्लखांब प्रात्यक्षिकात दुर्घटना; तरुण आगप्रयोगात भाजला
— Lokmat (@lokmat) April 8, 2025
पिंपरी : रामनवमीनिमित्त तळेगाव दाभाडे येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मल्लखांब खेळत असताना त्यावर आगीसंबंधी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. हे प्रात्यक्षिक दाखवत असताना एक तरुण भाजला. ही घटना ६ एप्रिल रोजी… pic.twitter.com/vT8FPZWuXc
मिरवणुकीमध्ये तलवारबाजी आणि आगीसंबंधी प्रात्यक्षिक करण्यास पोलिसांनी बंदी घातली होती. तरी देखील आयोजक सुरज थोरात याने मल्लखांब करणारा तरुण शिवम कसार याला आगीबाबत प्रात्यक्षिक करण्यास सांगितले. हे प्रात्यक्षिक करत असताना शिवम याच्या चेहऱ्याला भाजले. यामध्ये तो जखमी झाला. याप्रकरणी आयोजक आणि प्रात्यक्षिक सादर करणारा अशा दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.