वाहनांवर आमदार, खासदार, सरकारी कामावर, पोलिस पाट्या लावण्याचा सोस;दंडात्मक कारवाईकडे कानाडोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:46 IST2026-03-13T18:45:52+5:302026-03-13T18:46:39+5:30

- वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष : दंडात्मक कारवाईकडे कानाडोळा

pimpari-chinchwad news In Maval taluka, MLAs, MPs, government workers, and police boards are allowed to be placed on vehicles | वाहनांवर आमदार, खासदार, सरकारी कामावर, पोलिस पाट्या लावण्याचा सोस;दंडात्मक कारवाईकडे कानाडोळा

वाहनांवर आमदार, खासदार, सरकारी कामावर, पोलिस पाट्या लावण्याचा सोस;दंडात्मक कारवाईकडे कानाडोळा

- सचिन ठाकर 

पवनानगर :
मावळ तालुक्यात चारचाकी वाहनांवर विविध पदांच्या पाट्या व स्टिकर लावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तालुक्यातील अनेक वाहनांवर आमदार, खासदार, सरकारी कामावर, पोलिस, सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते, संघटना पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य अशा आशयाच्या पाट्या आढळून येत आहेत. वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून दंडात्मक करवाईकडे कानाडोळा केला जात आहे.

मावळ तालुक्यात ग्रामीण भागात जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे चारचाकी आलिशान वाहन वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर पाट्या लावण्याची क्रेझ वाढली आहे. पाट्यांमुळे संबंधित वाहनांना विशेष महत्त्व असल्याचा आभास तयार होतो. काहीजण स्वतःचा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. यामुळे सामान्य नागरिकांमधून टीका होत आहे.

नियमांची पायमल्ली

वाहतुकीच्या नियमांनुसार अनधिकृत पदनाम, सरकारी ओळख दर्शवणाऱ्या पाट्या लावणे चुकीचे आहे. तरीही अनेक खासगी वाहनांवर अशा पाट्या दिसून येत आहेत, ज्यामुळे नियमांची पायमल्ली होत आहे. काही वाहनांवर मोठ्या अक्षरांत वेगवेगळी स्टिकर लावली जातात; तर काही वाहनांवर आमदार, खासदार आणि सरकारी कामावर, पोलिस मित्र, सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते अशा प्रकारच्या पाट्याही आहेत. यामुळे कोण अधिकृत आहे आणि कोण नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. 

कारवाई टाळण्यासाठी शक्कल

वाहतूक तपासणी टाळण्यासाठी अथवा प्रभाव टाकण्यासाठी अशा पाट्यांचा वापर केला जातो, अशी चर्चा आहे. त्यामुळे वाहतूक विभाग आणि पोलिस प्रशासनाने यावेळी विशेष मोहीम राबवून अनधिकृत पाट्यांवर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. 

कारवाई होणार कधी?

मावळ तालुक्यात वाढत असलेल्या या प्रकारावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास भविष्यात वाहनांवर पदनामाच्या पाट्यांचा वापर आणखी वाढेल. त्यामुळे पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आणि नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी मावळ परिसरातील नागरिकांनी केली आहे.

 

Web Title : मावल: वाहनों पर अनाधिकृत प्लेटें; पुलिस की अनदेखी।

Web Summary : मावल में वाहनों पर विधायक, सांसद और 'सरकारी ड्यूटी पर' जैसे पदों को दर्शाने वाली अनाधिकृत प्लेटों में वृद्धि देखी जा रही है। नागरिक प्रभाव के लिए इन प्लेटों के उपयोग की आलोचना करते हैं, उल्लंघनकर्ताओं के खिलाफ पुलिस कार्रवाई और दुरुपयोग को रोकने के लिए यातायात नियमों के सख्त प्रवर्तन की मांग करते हैं।

Web Title : Maval: Unauthorized plates on vehicles; police turn a blind eye.

Web Summary : Maval witnesses rise in unauthorized plates on vehicles displaying positions like MLA, MP, and 'On Government Duty'. Citizens criticize the use of these plates for influence, demanding police action against violators and stricter enforcement of traffic rules to prevent misuse.