शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

मेट्रोतील सुरक्षा रक्षकांचे तीन महिन्यांचे वेतन थकले; ठेकेदारांविरोधात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:58 IST

- पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाने घेतली गंभीर दखल

पिंपरी : वॉरियर सिक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्व्हिसेस, अनंता स्काय इन्फ्राटेक या खासगी सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या कंपनीकडून मेट्रोमध्ये कार्यरत अनेक सुरक्षा रक्षकांचे वेतन थकवले असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित रक्षकांनी कामगार उपायुक्तांसह पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे तक्रार दाखल केली आहे. दिवाळीपूर्वी थकीत वेतन देण्याची मागणी या सुरक्षारक्षकांनी केली आहे.

कंपन्यांकडून मेट्रो सेवेतील ४० सुरक्षा रक्षकांचे वेतन प्रलंबित आहे. अनेक सुरक्षारक्षकांना दोन ते चार महिन्यांचे वेतन न मिळाल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काहींना घरभाडे आणि दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले आहे. कंपनीकडे वारंवार मागणी करूनही वेतन दिले जात नाही. उलट वेतनाबाबत विचारणा केल्यास धमकीच्या सुरात बोलले जाते, अशी सुरक्षा रक्षकांची तक्रार आहे. ठेकेदार कंपनीने श्रम कायद्याचे उल्लंघन केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. दिवाळीपूर्वी थकीत वेतन देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड्स (रोजगार व कल्याण) अधिनियमांतर्गत स्थापन केलेल्या पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने या प्रकरणाची दखल घेतली असून, संबंधित कंपनीकडून स्पष्टीकरण मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत संबंधित ठेकेदारांच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. 

यासंदर्भात संबंधित ठेकेदारांना सूचना दिल्या आहेत. दिवाळीपूर्वी सुरक्षारक्षकांना थकीत वेतन मिळेल. -श्रावण हर्डिकर, व्यवस्थापकीय संचालक, मेट्रो 

सुरक्षा रक्षकांना थकीत वेतनासह दिवाळी बोनस देण्याच्या सूचना संबंधित ठेकेदार संस्थेला देण्यात येतील. त्यानंतरही सुरक्षा रक्षकांना वेतन न दिल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. - प्रशांत वंजारी, सचिव, पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ 

कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. काम करूनही वेतन न देणे ही कामगारांच्या हक्कांची पायमल्ली आहे. प्रशासनाने थकीत वेतन आणि बोनस सुरक्षा रक्षकांना मिळवून द्यावेत. -चंद्रकांत कांबळे, संस्थापक अध्यक्ष, बहुजन कर्मचारी कामगार संघटना 

दररोज बारा तास काम करूनही तीन महिन्यांपासून वेतन नाही. साप्ताहिक सुटी मिळत नाही. दिवाळीचा बोनसही मिळालेला नाही. याबाबत कामगार उपायुक्तांकडे तक्रार केली आहे.-विजय सांगळे, सुरक्षारक्षक, वाकड  

English
हिंदी सारांश
Web Title : Metro security guards unpaid for three months; complaint filed.

Web Summary : Metro security guards haven't been paid for months, causing financial hardship. Complaints filed against contractors for labor law violations. Authorities are investigating, promising resolution before Diwali. Guards report working long hours without proper compensation.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रो