Video :पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या दुकानाला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 19:14 IST2026-01-01T19:13:49+5:302026-01-01T19:14:00+5:30
- पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या दुकानाला आग; मोठ्या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीती

Video :पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या दुकानाला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण
पिंपरी –पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी भागात एका फटाक्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना काही वेळापूर्वी घडली. आगीमुळे दुकानातील फटाक्यांनी एकामागोमाग एक पेट घेतल्याने मोठ्या आवाजात स्फोट होत असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेच्या ठिकाणी आजूबाजूला अनेक दुकाने असून जवळच एक रुग्णालयही आहे. त्यामुळे आग पसरू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या दुकानाला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण #pimpari#pimpari#fire#firepic.twitter.com/uPcI9S5ZPZ
— Lokmat (@lokmat) January 1, 2026
सध्या आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेत जीवितहानी झाली आहे का, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.