माणमधील कुंभारवाडा बंधारा पाण्याखाली;मुख्य ओढ्याला पूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:08 IST2025-06-19T19:07:56+5:302025-06-19T19:08:10+5:30

हिंगडे वस्ती यांचा गावठाणाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. बंधाऱ्याजवळच्या घरांना पुराचा फटका बसला असून, कुंभार व्यावसयिकांचे पत्राशेड आणि कच्च्या मालाचे नुकसान झाले आहे.

pimpari-chinchwad Kumbharwada dam in Maan under water; main stream flooded | माणमधील कुंभारवाडा बंधारा पाण्याखाली;मुख्य ओढ्याला पूर 

माणमधील कुंभारवाडा बंधारा पाण्याखाली;मुख्य ओढ्याला पूर 

हिंजवडी : माण गावातील मुख्य ओढ्याला पूर आल्याने कुंभारवाडा बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे ठाकर वस्ती, धुमाळ वस्ती, हिंगडे वस्ती यांचा गावठाणाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. बंधाऱ्याजवळच्या घरांना पुराचा फटका बसला असून, कुंभार व्यावसयिकांचे पत्राशेड आणि कच्च्या मालाचे नुकसान झाले आहे.



माण परिसरात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने, मुख्य गावओढा दुथडी भरून वाहत आहे. माण- हिंजवडी मुख्य रस्त्यावर असलेल्या गवारे मळा आणि बोडकेवाडी फाटा परिसरात रस्ता पाण्याखाली गेला आहे.

त्यामुळे आयटीपार्ककडे जाणारी वाहतूक काहीशी मंदावली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. माण गावातील ओढ्याच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने ओढ्यावरील रस्ता बंद झाला आहे. ग्रामस्थांना मोठा वळसा घालून गावठाणाकडे जावे लागत आहे.

ओढ्याच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने रस्ता बंद झाला आहे. बाजूलाच असलेल्या पत्राशेडमध्ये पाणी शिरल्याने कामासाठी लागणारी माती वाहून गेली आहे. काही मूर्तीसुद्धा वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. - बाळू कुंभार, व्यावसायिक माण

Web Title: pimpari-chinchwad Kumbharwada dam in Maan under water; main stream flooded