शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती

By श्रीनिवास नागे | Updated: June 1, 2025 15:36 IST

राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये घुमू लागले शड्डू; अमित शाह यांच्या स्वबळाच्या जोर-बैठकांमुळे डाव-प्रतिडाव सुरू; आखाड्यात उतरण्यासाठी इच्छुक पैलवानांकडून वस्तादांचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात

- श्रीनिवास नागे 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आखाडा मारण्यासाठी सर्वच पक्षांनी लांग कसली असली तरी खरी कुस्ती महायुतीतच होणार असल्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये घुमणारे शड्डू, अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यातील खडाखडी तेच संकेत देत आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वबळाच्या जोर-बैठका सुरू केल्याने येत्या दोन-चार महिन्यांत महायुतीत डाव-प्रतिडाव रंगणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीचा आखाडा सज्ज होऊ लागला आहे. इच्छुक पैलवानांनी आखाड्यात उतरण्यासाठी वस्तादांचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात केली आहे. महायुती एकत्रच लढणार, असे पुकारे काही नेत्यांनी दिले असले तरी, पिंपरी चिंचवडच्या मातीवरची लढत महायुतीतच होणार, असे दिसत आहे. कारण महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार आणि भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यात वर्चस्वासाठी शह-काटशह वाढत आहेत. लांडगे यांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शक्ती असल्याने आणि पवार यांना लांडगेंचे हिशेब पूर्ण करायचे असल्याने हा संघर्ष टोकदार बनला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी सर्वात तुल्यबळ आणि तोड पक्ष असल्याने दोन्ही बाजूंकडून स्वबळाचे शड्डू ठोकले जात आहेत.

भोसरी मतदारसंघातील कामांच्या उद्घाटन-भूमिपूजनासाठी लांडगे नेहमीच फडणवीसांना बोलावतात. त्यांची उठबैस फडणवीसांकडे असते, मात्र ते पवारांकडे जाण्याचे कटाक्षाने टाळतात. शहरातील कार्यक्रमांसाठी पवार येणार असतील तर लांडगे तिकडे पाठ फिरवतात. भाजपचे बडे नेते तेथे उपस्थित असतील, तर त्यांची काहीशी हजेरी असते. मात्र तशा कार्यक्रमात फडणवीसांचा उदोउदो आणि पवारांना अनुल्लेखाने मारणे असे डावपेच मुद्दाम टाकले जातात.

पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्रमावेळी पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचे सांगत लांडगे यांनी पवारांचा उल्लेख टाळला होता. पवारांनी तोच धागा पकडून लांडगे यांना माझे नाव घ्यायला का वाईट वाटले, हे मला माहीत नाही. परंतु, ज्याने चांगले काम केले आहे, त्याला चांगले म्हणायला शिका, असे खडे बोल पवारांनी फडणवीस यांच्यासमोरच लांडगे यांना सुनावले होते.

जगताप काय करणार?

शहरातील भाजपमध्ये महेश लांडगे यांच्यासोबत चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्याही शब्दाला वजन आहे. मात्र विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवार यांनी जगताप यांना मदत केली होती. त्यामुळे जगताप पवारांना विरोध करणार नाहीत, असे बोलले जाते.

मनोमिलन होणार का?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई-पुणे पट्टयातील महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचे संकेत दिले आहेत. अजित पवारांनी साथीदारांना तशी तयारी करण्यास सांगितले आहे. महायुतीने एकत्र लढण्याचे ठरवले तरी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी विशेषतः अजित पवार आणि महेश लांडगे एकत्र येणार का, वरिष्ठ पातळीवर प्रयत्न झाले तरीही दोघांचे मनोमिलन कसे आणि कितपत होणार? असा सवाल आहेच.

काय आहेत जुने आणि नवे हिशेब...

१ एकत्रित राष्ट्रवादी आणि त्यातही अजित पवार यांच्या इशाऱ्यावरच आमदार लांडगे यांनी सुरुवातीच्या राजकीय कुस्त्या मारल्या. भोसरीचे तत्कालीन आमदार विलास लांडे यांचा विरोध धुडकावून २०१४ मध्ये पवार यांनीच लांडगे यांना महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष केले. त्यादरम्यान बंडाचा झेंडा उंचावून लांडगे यांनी भोसरीतून अपक्षाची लांग बांधून विधानसभेचे मैदान जिंकले. मात्र २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपचा आखाडा जवळ केला. त्यानंतर पवार आणि त्यांच्यातील खडाखडी वाढली.

महापालिका निवडणुकीत 'नको बारामती, नको भानामती, शहरातील निर्णय २ शहरातच' असे फलक लावत त्यांनी पवार यांच्याविरुद्ध दंड थोपटले. पवारांचे एकेकाळचे पैलवान असलेल्या लांडगे आणि दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी पवारांचे महापालिकेतील वर्चस्व संपविले. तेव्हापासून लांडगे आणि पवार यांच्यात विस्तव जात नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना पवार यांनी लांडगे यांना 'घुटना' लावण्याचे पुरेपूर प्रयत्न केले.

महायुती सरकारमध्ये पवार सामील झाल्यानंतर लोकसभेवेळी भोसरीतून 3 त्यांच्या उमेदवाराला मदत करण्याऐवजी लांडगे यांनी हात आखडता घेतला. त्यामुळेच पवार यांनी शहरातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जाहीरपणे महापालिका स्वतंत्र लढवण्याचे मनसुबे जाहीर केले होते.

अजित पवार यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आल्यानंतर लांडगे यांची कोंडी होऊ लागली. कारण पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभारात पवार थेट लक्ष घालू लागले. महापलिकेबाबत बैठका, कार्यक्रमांचे आयोजन करू लागले. लांडगे यांनी त्यांच्यापासून चार हात दूर राहणे पसंत केले. कामांसाठी ते फडणवीसांनाच महत्त्व देऊ लागले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAmit Shahअमित शाहAjit Pawarअजित पवारmahesh landgeमहेश लांडगेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुती