रावेतमध्ये फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली पोलिसाची केली तब्बल ५४ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 14:14 IST2025-08-21T14:13:30+5:302025-08-21T14:14:01+5:30

पिंपरी : रावेत येथील देवकर प्लाझा बिल्डिंगमध्ये फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली एका पोलिसाची ५४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात ...

pimpari-chinchwad crime Police officer cheated of Rs 54 lakhs in the name of booking a flat in Ravet | रावेतमध्ये फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली पोलिसाची केली तब्बल ५४ लाखांची फसवणूक

रावेतमध्ये फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली पोलिसाची केली तब्बल ५४ लाखांची फसवणूक

पिंपरी : रावेत येथील देवकर प्लाझा बिल्डिंगमध्ये फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली एका पोलिसाची ५४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना जुलै २०१९ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडली.

विशाल लक्ष्मण ओव्हाळ (वय ३२, रा. कावेरीनगर, पोलिस वसाहत, वाकड) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. १९) रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिल दत्तात्रय देवकर आणि कुमोद अनिल देवकर (रा. निगडी प्राधिकरण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल ओव्हाळ हे पोलिस आहेत.

संशयितांनी आपसांत संगनमत करून देवकर प्लाझा बिल्डिंगमध्ये फ्लॅटचे बांधकाम पूर्ण न करता, त्याचा ताबा न देता, फिर्यादी आणि त्यांचे मित्र अनिल जगताप व जावेद मुजावर यांच्याकडून धनादेश आणि आरटीजीएसद्वारे एकूण ५४ लाख ५० हजार रुपये स्वीकारले. संशयितांनी या संपूर्ण रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला आणि फिर्यादीची फसवणूक केली. तसेच, संशयितांनी फिर्यादीला धमकीदेखील दिली.

Web Title: pimpari-chinchwad crime Police officer cheated of Rs 54 lakhs in the name of booking a flat in Ravet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.