व्हिलामधील पार्टीत राडा; मालक व केअरटेकरला बेदम मारहाण;१२ जणांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 11:19 IST2026-01-08T11:18:11+5:302026-01-08T11:19:19+5:30
- सोमाटणे येथील एका व्हिला येथे पार्टी करण्यासाठी आले होते. त्यांनी व्हिलामध्ये गोंधळ आणि आपसात मारामारी सुरू केल्याने व्हिलाचे मालक व केअरटेकर त्यांना समजावून सांगण्यासाठी गेले

व्हिलामधील पार्टीत राडा; मालक व केअरटेकरला बेदम मारहाण;१२ जणांविरोधात गुन्हा
पिंपरी : एका व्हिलामध्ये पार्टीसाठी आलेल्या तरुणांनी आपसात भांडण करून व्हिला मालक आणि केअरटेकरला लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी (५ जानेवारी) रात्री साडेनऊच्या सुमारास सोमाटणे येथे घडली.
गोपाल सुरेंद्र मोरे (वय ४३, रा. हिंजेवाडी फेज १, पुणे) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य दत्तात्रय ठाणगे (२४), ऋतिक सुधाकर वाघमारे (२१), शुभम दिलीप अहिरवाल (२५), अनिल गेनभाऊ ढेंगळे (२५), अनिकेत प्रतापराव वाघेरे (२४), शंभुराज संजय रणदिवे (२०), गणेश मिठू भड (२९), प्रणव शंकर कोलते (२५), संतोष शाम भोसले (२०), शिवम प्रकाश घुले (२५), अनिल प्रकाश घुले (रा. दिघी गावठाण, पुणे) आणि हर्ष परदेशी (रा. कळस, ता. हवेली, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सर्वजण सोमाटणे येथील एका व्हिला येथे पार्टी करण्यासाठी आले होते. त्यांनी व्हिलामध्ये गोंधळ आणि आपसात मारामारी सुरू केल्याने व्हिलाचे मालक फिर्यादी व केअरटेकर त्यांना समजावून सांगण्यासाठी गेले. त्यावेळी आदित्य याने फिर्यादीस शिवीगाळ करून लाकडी काठीने पाठीत व हातावर मारहाण केली. इतर संशयितांनी केअरटेकरला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिली आणि व्हिलामधील सामानाचे नुकसान केले.