केकचे पैसे मागितल्याने बेकरीत दहशत; पिंपरीत कोयत्याच्या धाकावर दोन हजार रुपये हिसकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 18:01 IST2026-03-01T18:00:05+5:302026-03-01T18:01:08+5:30

- केक घेतल्यानंतर पैसे न देता निघण्याचा प्रयत्न केला. दुकानदाराने पैसे मागितल्यावर त्यांनी कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केली.

pimpari-chinchwad crime panic in bakery after asking for money for cake; Two thousand rupees snatched in Pimpri on the pretext of a coyote | केकचे पैसे मागितल्याने बेकरीत दहशत; पिंपरीत कोयत्याच्या धाकावर दोन हजार रुपये हिसकावले

केकचे पैसे मागितल्याने बेकरीत दहशत; पिंपरीत कोयत्याच्या धाकावर दोन हजार रुपये हिसकावले

पिंपरी - केकचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून तिघांनी बेकरीत दहशत माजवत दुकानदाराकडून दोन हजार रुपये हिसकावून नेल्याची घटना पिंपळे सौदागर परिसरात घडली. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाणे येथे तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (दि. २६) रात्री सुमारे सव्वा अकराच्या सुमारास घडली. पिंपळे सौदागर येथील एका बेकरीत तिघे संशयित आले. त्यांनी केक घेतल्यानंतर पैसे न देता निघण्याचा प्रयत्न केला. दुकानदाराने पैसे मागितल्यावर त्यांनी कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केली.

यावेळी संशयितांनी दुकानदाराच्या शर्टाच्या खिशातून दोन हजार रुपये काढून घेतले. तसेच कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी आदित्य मानवतकर, अथर्व चव्हाण आणि यश दुर्गे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी नौशाद मुख्तार अहमद (वय ४२, रा. जगताप नगर, पिंपळे सौदागर) यांनी शनिवारी (दि. २८) पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास सांगवी पोलिस करत आहेत.

 

Web Title : केक के पैसे मांगने पर बेकरी में दहशत; पिंपरी में ₹2000 लूटे।

Web Summary : पिंपरी में, केक के पैसे मांगने पर तीन लोगों ने एक बेकरी में दहशत फैलाई। दरांती दिखाकर, उन्होंने दुकानदार से ₹2000 लूट लिए। पुलिस ने आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है, जिससे इलाके में तनाव है।

Web Title : Bakery terrorized over cake money; ₹2000 stolen in Pimpri.

Web Summary : In Pimpri, three individuals terrorized a bakery for demanding cake payment. Brandishing a sickle, they stole ₹2000 from the shopkeeper. Police have registered a case against the accused, creating tension in the area.