Crime News : किचनमधील वाद जीवावर बेतला; सिलिंडर टाकी डोक्यात घालून तरुणाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:03 IST2026-03-11T13:02:45+5:302026-03-11T13:03:39+5:30
जेवण बनविण्याच्या कारणावरून झाला वाद; सिलिंडर टाकी डोक्यात घालून तरुणाचा खून

Crime News : किचनमधील वाद जीवावर बेतला; सिलिंडर टाकी डोक्यात घालून तरुणाचा खून
पिंपरी : जेवण बनविण्याच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणाच्या डोक्यात सिलिंडर टाकी मारून खून करण्यात आला. ही घटना मोशीतील हवालदार वस्ती येथे घडली. एमआयडीसी भोसरी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी मारुती खंडारे (वय ३२, रा. हंगरगा, ता. उदगीर, जि. लातूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. प्रदीप विठ्ठल गुंडरे (२९, रा. आंधोरी, अहमदपूर, जि. लातूर) याला अटक केली आहे.
बालाजी खंडारे आणि संशयित प्रदीप हे नातेवाईक असून दोघेही हवालदार वस्ती येथे मजूर म्हणून काम करत होते. त्याच ठिकाणी ते राहत होते. सोमवारी (दि. ९) रात्री दारू पिल्यानंतर जेवण बनविण्याच्या कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. यात प्रदीप याने बालाजी याच्या डोक्यात सिलिंडरची टाकी घातली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.