Video : पुजाऱ्याच्या वेशात आला, देवाला हात जोडले अन्....! मंदिरातील थरार सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 13:32 IST2026-03-02T13:21:22+5:302026-03-02T13:32:49+5:30

आरोपीने चोरीसाठी अनोखी शक्कल लढवत पुजाऱ्याची वेशभूषा परिधान केली आणि मंदिरात प्रवेश केला.

pimpari-chinchwad crime News Hands folded to God A silver crown disappeared in a moment! Shocking incident in Chinchwad | Video : पुजाऱ्याच्या वेशात आला, देवाला हात जोडले अन्....! मंदिरातील थरार सीसीटीव्हीत कैद

Video : पुजाऱ्याच्या वेशात आला, देवाला हात जोडले अन्....! मंदिरातील थरार सीसीटीव्हीत कैद

पिंपरी- चिंचवड परिसरात असलेल्या भगवान श्री आदेश्वर शंकेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिर येथे पुजाऱ्याच्या वेशात येऊन चांदीचा मुकुट चोरणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

मिळलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट १ ने अटक केलेल्या आरोपीचे नाव नरेश अगरचंद जैन असे आहे. आरोपीने चोरीसाठी अनोखी शक्कल लढवत पुजाऱ्याची वेशभूषा परिधान केली आणि मंदिरात प्रवेश केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते की, मंदिरात प्रवेश करताच त्याने प्रथम देवासमोर हात जोडून दर्शन घेतले. त्यानंतर योग्य संधी साधत सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचा व एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट कपड्याने झाकून लंपास केला.

 




चोरी केल्यानंतर आरोपी अत्यंत शिताफीने मंदिरातून बाहेर पडला. मात्र, ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा युनिट १ ने तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत आरोपीला जेरबंद केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश जैन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत तब्बल १२ गुन्हे दाखल आहेत. चोरीस गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर मंदिर प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title : चिंचवड: प्रार्थना के बाद चांदी का मुकुट गायब; चोर गिरफ्तार

Web Summary : चिंचवड में एक जैन मंदिर से पुजारी के भेष में एक शातिर चोर ने ₹2.5 लाख का चांदी का मुकुट चुरा लिया। पुलिस ने 48 घंटों के भीतर नरेश जैन को गिरफ्तार कर लिया। जैन पर पहले से 12 अपराध दर्ज हैं। सीसीटीवी फुटेज से उसे पकड़ा गया। मुकुट बरामद कर लिया गया है, सुरक्षा बढ़ाई जा रही है।

Web Title : Chinchwad: Silver Crown Vanishes After Prayer; Thief Arrested Quickly

Web Summary : A seasoned thief, disguised as a priest, stole a silver crown worth ₹2.5 lakh from a Jain temple in Chinchwad. Police swiftly arrested the culprit, Naresh Jain, within 48 hours. Jain, with 12 prior offenses, was caught using CCTV footage. The stolen crown was recovered, and security is being increased.