कामगारांच्या रक्त तपासणी अहवालात घोटाळा;नियम डावलून बनावट अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 14:02 IST2026-04-05T14:02:19+5:302026-04-05T14:02:29+5:30

- थेरगाव-चाकण-कराड येथील प्रयोगशाळांमधील धक्कादायक प्रकार, कामगारांसह कंपनी मालकांची फसवणूक, कामगार संघटनांकडून संताप व्यक्त 

pimpari-chinchwad crime News Fraud in workers' blood test reports; fake reports bypassing rules | कामगारांच्या रक्त तपासणी अहवालात घोटाळा;नियम डावलून बनावट अहवाल

कामगारांच्या रक्त तपासणी अहवालात घोटाळा;नियम डावलून बनावट अहवाल

- रवींद्र जगधने 

पिंपरी : चाकण आणि कराड (सातारा) येथील काही प्रयोगशाळांनी काही कारखान्यातील कामगारांच्या रक्त तपासणीचे बनावट अहवाल दिल्याचा प्रकार समोर आला आहे. नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग ॲण्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीजच्या (एनएबीएल) नियमांचे उल्लंघन करून हे रिपोर्ट दिले जात आहेत. शासनाच्या निर्णयानुसार कारखान्यातील कामगारांची आरोग्य तपासणी अनिवार्य आहे, पण या प्रयोगशाळांनी नियम डावलून कामगार-मालक दोघांचीही फसवणूक केली.

प्रत्येक वर्षी कारखान्यातील कामगारांची आरोग्य तपासणी करणे बंधनकारक आहे. यासाठी एनएबीएल प्रमाणित प्रयोगशाळा आवश्यक आहे. पण अनेक प्रयोगशाळांकडे एनएबीएलचे पूर्ण प्रमाणपत्र नसतानाही त्यांनी कामगारांची रक्त तपासणी केली आणि एनएबीएलचा लोगो छापून अहवाल दिले. सीबीसी, बायोकेमिस्ट्री सारख्या महत्त्वाच्या चाचण्या ‘स्कोप’ बाहेर होत्या. यामुळे कामगारांना खोटे अहवाल मिळाले आणि त्यांचा जीव धोक्यात घातला गेला आहे.

चाकण येथील ॲडव्हान्स हायटेक या प्रयोगशाळेचा असाच अहवाल समोर आला असून या प्रयोगशाळेकडे मर्यादित एनएबीएल स्कोप मशीन आहे. मात्र, या प्रयोगशाळेकडून सर्व प्रमाणके वापरून कामगारांना अहवाल दिले आहेत. एनएबीएल प्रमाणीकरण नसलेल्या थेरगाव येथील एका प्रयोगशाळेने चिंचवडमधील एका कंपनीला कामगारांचे रक्त तपासणी अहवाल दिल्याचे समोर आले आहे.

काय सांगतो शासन निर्णय?

शासन निर्णयानुसार कारखान्यातील कामगारांच्या वार्षिक आरोग्य तपासणीसाठी एनएबीएल प्रमाणित प्रयोगशाळा अनिवार्य आहेत. रक्त चाचण्या अचूक आणि विश्वासार्ह हव्यात. पण या प्रयोगशाळांनी फक्त प्रमाणपत्र मिळवले आणि नियम डावलले. महागड्या मशीन ऐवजी स्वस्त आणि कमी दर्जाच्या मशीन वापरल्या. काही ठिकाणी पुणे-मुंबईतील इतर शहरांतील एनएबीएल असलेल्या प्रयोगशाळांचे लेटरहेड वापरून अहवाल दिले. रक्त घेताना योग्य प्रमाणही पाळले नाही.

कामगार संघटनांची मागणी काय?

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. कामगार आरोग्य विभागाने तज्ज्ञांच्या पथकाची स्थापना करावी. दोषी प्रयोगशाळांवर कठोर कारवाई करावी. सर्व बनावट अहवाल रद्द करावेत आणि कामगारांना पुन्हा एनएबीएल स्कोप असलेल्या प्रयोगशाळेतून तपासणी करून नवे अहवाल द्यावेत, अशी मागणी कामगार संघटना करत आहेत.

 यापूर्वी एनएबीएल प्रमाणीकरण प्रयोगशाळा अनिवार्य होत्या. मात्र, शासनस्तरावर आता नव्याने याबाबत नियमावली करण्याचे काम सुरू आहे.  - संजय गिरी, सह संचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय 



कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कंपन्यांकडून कामगारांची दरवर्षी आरोग्य तपासणी केली जाते. त्यासाठी शासनाने नियम घालून दिले आहेत. मात्र, प्रयोगशाळांकडून बनावट अहवाल देत असतील, तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे.  - नामदेव पवार, शहराध्यक्ष, भाजप कामगार मोर्चा

Web Title : कर्मचारी रक्त परीक्षण रिपोर्ट घोटाला: नियमों का उल्लंघन, नकली रिपोर्ट।

Web Summary : चाकण और कराड में कर्मचारी रक्त परीक्षण रिपोर्ट में घोटाले का पर्दाफाश हुआ है। प्रयोगशालाओं ने एनएबीएल मानदंडों का उल्लंघन किया, जिससे गलत रिपोर्टों के साथ श्रमिकों के स्वास्थ्य को खतरा हुआ। यूनियनों ने जांच और पुनः परीक्षण की मांग की है।

Web Title : Worker blood test report scam: Fake reports violating rules.

Web Summary : A scam involving fake worker blood test reports has surfaced in Chakan and Karad. Labs violated NABL norms, endangering workers' health with inaccurate results. Unions demand investigation and retesting.