शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

फलक हॉटेलचा... आतमध्ये दारूविक्री

By admin | Updated: July 26, 2015 01:41 IST

शहरातील कायदा-सुव्यवस्था ढासळलेली असून, ठिकठिकाणी पोलिसांच्या कृपेने अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. बेकायदा आणि विनापरवाना दारूविक्री सुरू आहे.

पिंपळे गुरव : शहरातील कायदा-सुव्यवस्था ढासळलेली असून, ठिकठिकाणी पोलिसांच्या कृपेने अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. बेकायदा आणि विनापरवाना दारूविक्री सुरू आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने पोलीसपथक कारवाई करण्यास धजावत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सांगवी, पिंपळे गुरव परिसरात हॉटेलमध्ये विनापरवाना दारूविक्री जोरात आहे. दापोडी, जुनी सांगवी व पिंपळे गुरवमध्ये परवानाधारक दारूविक्रीची दुकाने आहेत. मात्र खरेदी केलेली दारूपिण्यासाठी मोकळी वा अडगळीची जागा पाहून तळीरामांची मैफल जमते. अशा मोकळ्या जागेजवळील रहिवाशांना या सर्व गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागतो. दारूविक्री परवाना काढण्यासाठी लागणारी अनेक कागदपत्रे, अनधिकृत बांधकाम, सोसायटीचे संमतीपत्र यामुळे व्यावसायिक सध्या शॉर्टकटचा अवलंब करताना दिसत आहेत. यामध्ये हॉटेल व्यावसायिक आणि पोलीस यांचा फायदा अधिक होत आहे. परिसरात विनापरवाना दारूविक्री करणाऱ्या हॉटेलांची संख्या मोठी आहे. कृष्णा चौक ते काटेपुरम् चौक या रस्त्यावर महापालिकेच्या आरक्षित जागेवर नाट्यगृह उभारणीचे काम सुरू आहे. याच जागेतून नंदनवन कॉलनी व गुरुदत्त कॉलनीसाठी रस्ता आहे. त्यामुळे रात्री महिला व ज्येष्ठ नागरिकांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो. परिसरात वाहनचालक व रिक्षाचालक आडोशाचा फायदा घेऊन मोकळ्या जागेत रात्री दारू पिणारी टोळकी दिसतात. हे तळीराम दारू पिऊन त्याच ठिकाणी बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या व खरकटे टाकतात. त्यामुळे अस्वच्छता व दुर्गंधी पसरते. ही टोळकी दिसली, तरी पोलीस कारवाई करीत नाहीत. (वार्ताहर)राजकारण्यांच्या नातेवाइकांची हॉटेल्स-सांगवी, पिंपळे गुरव परिसरात २५ हून अधिक हॉटेल आहेत. एकाही हॉटेलला परमिट रूमचा फलक नाही. राजरोसपणे दारूपिण्यास परवानगी दिली जाते. काही हॉटेलमध्ये नाममात्र शुल्क घेऊन दारू पिण्यास परवानगी दिली जाते. पुढे वाईन शॉप आणि मागे दारूविक्री एखाद्या वेळी कारवाई केली, तर दुसऱ्याच दिवशी पुन्हा दारूविक्री पूर्ववत होते. कारण अनेक हॉटेल राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नातेवाइकांची असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईस पोलीस टाळाटाळ करतात.