इमारतीवरून साडीच्या साहाय्याने उतरत असताना एकाचा पडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 19:36 IST2022-09-01T19:36:39+5:302022-09-01T19:36:45+5:30
असंवेदनशिल असलेल्या काही जणांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला.

इमारतीवरून साडीच्या साहाय्याने उतरत असताना एकाचा पडून मृत्यू
पिंपरी : इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून साडीच्या साहाय्याने उतरत असलेल्या एकाचा पडून मृत्यू झाला. निगडी ओटास्किम येथे बुधवारी (दि. ३१) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. अनिल सुदाम कांबळे (वय ५०, रा. ओटा स्किम, निगडी), असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल कांबळे यांना दारूचे व्यसन होते. अनिल यांनी बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घराच्या खिडकीतून साडीच्या साहाय्याने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हातातून साडी सुटून ते खाली कोसळले. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
अनिल कांबळे हे साडीच्या साहाय्याने इमारतीवरून उतरत होते. त्यावेळी काही बघ्यांनी त्याचे व्हिडिओ रेकाॅर्डिंग केले. मोबाईलमध्ये शुटिंग करत असलेल्यांपैकी कोणीही अनिल कांबळे यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही. असंवेदनशिल असलेल्या काही जणांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला.