अनैतिक संबंधातून महिलेनं ओढणीने गळा आवळून केला खून; लग्नास दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 10:52 IST2021-08-16T10:51:53+5:302021-08-16T10:52:00+5:30

सुमारे एक वर्षापासून होते अनैतिक संबंध

Murder by strangulation of a woman in an immoral relationship; The marriage was refused | अनैतिक संबंधातून महिलेनं ओढणीने गळा आवळून केला खून; लग्नास दिला होता नकार

अनैतिक संबंधातून महिलेनं ओढणीने गळा आवळून केला खून; लग्नास दिला होता नकार

ठळक मुद्देलॉजवर भेटण्यास बोलावून केला खून

पिंपरी : विवाहबाह्य संबंधातून एकाचा खून झालायं. महिलेने भेटण्यास बोलावून ओढणीने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  चिंचवड येथे शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

पैगंबर गुलाब मुजावर (रा. एमआयडीसी भोसरी), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने शनिवारी (दि. १४) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तिला अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  महिलेचा पती पैगंबर मुजावर व आरोपी महिला हे दोघेही एकाच ठिकाणी कामाला होते. त्यांचे सुमारे एक वर्षापासून अनैतिक संबंध होते. पैगंबर हा भेटायला येत नाही. तसेच लग्न करण्यास नकार देतो. या कारणावरून आरोपी महिलेने वाद घातला. पैगंबर याला चिंचवड येथे लॉजवर भेटण्यास बोलावून घेतले. त्यानंतर ओढणीने गळा आवळून पैगंबर याला जीवे ठार मारले.

Web Title: Murder by strangulation of a woman in an immoral relationship; The marriage was refused