पिंपरी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून झालेल्या अपघातामुळे गेल्या २४ तासांपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. हजारो प्रवासी अडकून पडल्याने त्यांनी रेल्वेचा पर्याय निवडला आहे. परिणामी, चिंचवड स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये गर्दी वाढली. त्यामुळे प्रवाशांना बसण्यास जागा मिळत नसल्याचे दिसून आले. डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्स्प्रेस आणि सिंहगड एक्स्प्रेससारख्या ट्रेन पूर्णपणे भरून चालल्या आहेत, त्यामुळे रेल्वे सेवेवर अतिरिक्त दबाव आला आहे.
शहरातील हजारो नोकरदार आणि व्यावसायिक दररोज मुंबईला जातात. महामार्गावरील या कोंडीमुळे त्यांनी रेल्वेकडे धाव घेतली, तसेच मुंबईकडे जाणारे एसटीचे प्रवासीही वल्लभनगर आगारात उतरविण्यात आले. त्याही प्रवाशांनी लोकल ट्रेनकडे माेर्चा वळवत लोणावळ्याच्या दिशेने प्रवास केला असल्याचे दिसून आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, नियमित ट्रेन वेळेवर धावत आहेत; पण गर्दीमुळे प्रवाशांची जास्त गैरसोय झाली नाही.
पोलिसांनी सांगितले की, टँकर उचलण्याचे काम सुरू आहे. शक्यतो महामार्ग टाळावा आणि रेल्वे वापरताना गर्दी लक्षात घ्यावी. या घटनेने शहरातील ट्रॅफिक व्यवस्थेच्या कमकुवतपणावर प्रकाश टाकला आहे. या घटनेमुळे मुंबई-पुणे हायस्पीड रेल्वेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
रस्ते मार्गावर झालेल्या कोंडीमुळे अनेक प्रवासी रेल्वेकडे वळाले. प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. यासाठी रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी योग्य त्या उपाययोजना करीत आहेत. - हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे
Web Summary : Gas tanker accident on Mumbai-Pune Expressway caused massive traffic. Commuters shifted to trains from Chinchwad, leading to overcrowding. Key trains like Deccan Queen were packed, straining rail services. The incident highlighted the need for better transport solutions.
Web Summary : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पर गैस टैंकर दुर्घटना से भारी जाम। यात्रियों ने चिंचवड से ट्रेनों का रुख किया, जिससे भीड़ बढ़ गई। डेक्कन क्वीन जैसी प्रमुख ट्रेनें भरी रहीं, रेल सेवाओं पर दबाव बढ़ा। घटना ने बेहतर परिवहन समाधान की आवश्यकता पर प्रकाश डाला।