चिंचवडमध्ये २ मजुरांमध्ये किरकोळ भांडण; एकाने दुसऱ्याला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 14:49 IST2026-03-30T14:49:07+5:302026-03-30T14:49:56+5:30

खून करणारा मजूर घटनास्थळावरून पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली.

Minor fight between 2 laborers in Chinchwad; One pushes the other to death from the second floor | चिंचवडमध्ये २ मजुरांमध्ये किरकोळ भांडण; एकाने दुसऱ्याला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याने मृत्यू

चिंचवडमध्ये २ मजुरांमध्ये किरकोळ भांडण; एकाने दुसऱ्याला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याने मृत्यू

पिंपरी : घर दुरुस्तीच्या कामाच्या दरम्यान दोन मजुरांमध्ये किरकोळ भांडण झाले. यात एकाने दुसऱ्या मजुराला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याने मृत्यू पावला. चिंचवड येथील वाल्हेकरवाडी येथे रविवारी (दि. २९) दुपारी सुमारे १२:१५ वाजता हा धक्कादायक खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. संशयिताला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

केशवकुमार महतो (वय २६) असे मृत मजुराचे नाव आहे. तो मूळचा बिहारचा रहिवासी असून, सध्या चिखलीतील अष्टविनायक चौक येथे भाड्याच्या घरात राहत होता. पुनीत राम नक्षत्र शुक्ला (वय २८, मूळ बिहार) असे संशयिताचे नाव आहे.

चिंचवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय चासकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनीत शुक्ला याने कामाच्या ठिकाणी भांडण झाल्याने केशवकुमार याला दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलले. यात केशवकुमारचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुनीत शुक्ला घटनास्थळावरून पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला. दोन्ही मजूर सध्या चिखलीतील अष्टविनायक चौक येथे भाड्याच्या घरात राहत होते. सतीश शिंदे यांचे घर दुरुस्तीचे काम चालू असताना किरकोळ कारणावरून वाद वाढला आणि ही दुर्दैवी घटना घडली.

Web Title : चिंचवाड़ में बहस: मजदूर को दूसरी मंजिल से धक्का, मौत

Web Summary : चिंचवाड़ में दो मजदूरों के बीच मामूली बहस बढ़ने पर एक मजदूर ने दूसरे को दूसरी मंजिल से धक्का दे दिया, जिससे उसकी मौत हो गई। पुलिस ने संदिग्ध को गिरफ्तार कर लिया है और जांच जारी है।

Web Title : Argument in Chinchwad: Laborer Pushed from Second Floor, Dies

Web Summary : In Chinchwad, a minor argument between two laborers escalated tragically. One laborer pushed the other from the second floor, resulting in the victim's death. Police arrested the suspect, and an investigation is underway.