शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

मध्यावधी निवडणुकीचे पिलू आमचे नव्हेच!

By admin | Updated: July 27, 2015 03:51 IST

विधानसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे मान्य केले होते.

पिंपरी : विधानसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे मान्य केले होते. मध्यावधी होणार हे पिलू आम्ही सोडलेले नाही. हे सरकार किती दिवस एकत्रितपणे चालवायचे हा सेना-भाजपचा प्रश्न आहे. ते जातीयवादी आणि आम्ही फुले-शाहू-आंबेडकर विचाराचे आहोत. युती ही समविचारी लोकांची होते, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आकुर्डी येथे व्यक्त केले. युतीतून शिवसेना बाहेर पडली, तर भाजपाला पाठिंबा देणार का? या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. त्या वेळी पुन्हा निवडणुका परवडणारे नसल्याने महाराष्ट्राच्या भल्यासाठी, विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही बाहेरून पाठिंबा देण्याचे मान्य केले होते. मात्र, शिवसेनेबरोबर त्यांची युती झाली. मला वाटते, आघाडी ही समविचारी पक्षांची होत असते. त्यांचे आणि आमचे विचार वेगवेगळे आहेत. अच्छे दिनची जादू किती दिवस चालणार यावर युती टिकणार आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा, हा त्यांचा प्रश्न आहे. असे जरी असले, तरी हा सर्व खेळ जनता पाहत आहे. मध्यावधीचे आम्ही कोणतेही पिलू सोडलेले नाही.’’केंद्राकडे पाठपुरावा करणारविकासकामांत आम्ही राजकारण करीत नाही. सत्तेत असताना सध्याच्या मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांचीही कामे केली आहेत, असे सांगून पवार म्हणाले, ‘‘पवनासुधार, मेट्रो, रिंगरोडसाठी पाठपुरावा करणार आहे. मुळा, मुठा, इंद्रायणी नद्यांचे पर्यावरण चांगले राहावे, तसेच पवनासुधारसाठी पर्यावरणमंत्री जावडेकरांना भेटणार आहे.’’ बंद जलवाहिनीबाबत न्यायालय निर्णयाचे पालन व्हावेपवार म्हणाले, ‘‘पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प राबविताना विरोध झाला. योग्यप्रकारे या योजनेबाबत विचार आणि चर्चा न झाल्याने त्या विरोधात आंदोलन झाले. त्यात शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला. त्याचे निवडणुकीमध्ये राजकारणही केले. या संदर्भात उच्च न्यायालयात दावा सुरू होता. या विषयी न्यायालयाने ज्या सूचना केल्या आहेत. बारापैकी आठ महिने बंदिस्त जलवाहिनीद्वारे आणि उर्वरित चार महिने नदीतून पाणी उचलावे, असा निर्णय दिला आहे. त्याचे पालन व्हावे.’’मेनन फाशीत राजकारण आणू नयेअतिरेकी कारवायाबाबतचा देशद्रोहाचा गुन्हा सिद्ध झाला असेल आणि याकूब मेननविषयी उच्च व सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असेल, तर त्याची अंमलबजावणी करायलाच हवी. त्यात कोणतेही राजकारण आणता कामा नये, असेही पवार म्हणाले. (वार्ताहर)