शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

मेट्रोचा डीपीआर येणार स्थायी पुढे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 2:46 PM

महापालिका निवडणूकीपूर्वी पहिल्या टप्यात स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोला मंजूरी मिळाली.

ठळक मुद्देनिगडी मेट्रोसाठी  १०४८ कोटींचा खर्च येणार चिचवड, आकुर्डी आणि निगडी हे तीन मेट्रोस्टेशन असणार.

पिंपरी : पिंपरी महापालिका भवन ते निगडी या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पासाठी एक हजार ४८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल अर्थात डिपीआर महामेट्रोने तयार करण्यात आला असून महापालिका स्थायी समिती समोर तो ठेवण्यात आला आहे. महापालिका निवडणूकीपूर्वी पहिल्या टप्यात स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोला मंजूरी मिळाली. मात्र, पहिल्या टप्प्यातच ही मेट्रो निगडीपर्यंत नेण्याची मागणी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसे आदी राजकीय पक्षांनी केली होती. मात्र, त्यावर अधिक खर्च होणार असल्याने हा मार्ग लांबणीवर पडला होता. त्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांनी महामेट्रोला डिपीआर तयार करण्यास सांगितले. महामेट्रोने 'सिस्ट्रा' या आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून हा डिपीआर तयार करून घेतला आणि महापालिकेकडे सादर केला. सप्टेंबर महिन्यातच तयार झालेला हा डीपीआर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आॅक्टोबरमध्ये सादर केला.    महामेट्रो आणि सिस्टाच्या अधिकाºयांनी या बाबतच प्रेझेंटेशन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अन्य अधिकाऱ्यांसमोरही केले आहे. हा डीपीआर स्थायी समिती सभेत मांडण्यासाठी मुहूर्त मिळाला आहे. स्थायी समितीतर्फे हा अहवाल महापालिका सभेत जाणार असून त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारकडे तो सादर करण्यात येणार आहे. पिंपरी - चिंचवड महापालिका भवन ते निगडीपर्यंत ही मेट्रो जाणार असून या मार्गाचे एकुण अंतर ४.४१३ किलोमीटर असून मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या तीन ठिकाणी मेट्रोस्टेशन असणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी भूसंपादन करणे आणि सेवा वाहीन्यांचे स्थलांतर करणे आदी कामासाठी १०४८.२२ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्यासाठी हजार कोटी खर्च अपेक्षीत आहे. ...................................महापालिका भवन ते निगडी अंतर ४.४१३ किलोमीटर.चिचवड, आकुर्डी आणि निगडी हे तीन मेट्रोस्टेशन असणार.प्रकल्पाच्या कामासाठी भूसंपादन करणे आणि सेवा वाहीन्यांचे स्थलांतरासाठी १०४८.२२ कोटी खर्च

टॅग्स :PuneपुणेnigdiनिगडीMetroमेट्रो