शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांना लाल दिव्याच्या गाडीची हौस

By admin | Updated: April 20, 2017 21:33 IST

पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि पुण्याचे महापौर यांनी आपल्या वाहनावरील लाल दिवा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 20 - पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि पुण्याचे महापौर यांनी आपल्या वाहनावरील लाल दिवा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांना गाडीवरील दिवा काढण्याचा सोस काही आवरत नसल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पक्षनेते एकनाथ पवार यांनी सर्वप्रथम महापालिकेचे वाहन वापरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी महापालिकेचे वाहन नाकारले. जनतेच्या पैशांची बचत व्हावी, यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सत्ताधाºयांनी सांगितले होते. तसेच पत्रकारांना स्थायी समितीच्या बैठकीस बसण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, महापौरांनी शासकीयच वाहन वापरणार असल्याचे माध्यमांना सांगितले होते. दरम्यान जनता आणि सरकार यांच्यातील अंतर कमी व्हावे यासाठी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहनावरील लाल दिवा हटविला. त्यानंतर पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी लाल दिवा काढला. गुरूवारी पुण्याचे महापौर मुक्ता टिळक यांनीही आपल्या वाहनावरील दिवा काढला. याबाबत पिंपरी-चिंचवडचे महापौर कोणता निर्णय घेणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, त्यांनी दिवा काढण्याबाबत उनुत्सुकता दर्शविली आहे. उलट लाल दिव्याचे समर्थने केले. नितीन काळजे म्हणाले, ‘‘महापौरांना विविध कार्यक्रमासाठी बाहेर फिरावे लागते. त्यामुळे दिवा आवश्यक आहे. याबाबत नेत्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल.’’