Pimpri Chinchwad : कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून पावणे सात लाखांचे साहित्य चोरीला

By नारायण बडगुजर | Updated: October 15, 2023 17:17 IST2023-10-15T17:16:32+5:302023-10-15T17:17:42+5:30

कंपनीमधून गेअर बॉक्स, इनव्हर्टर, स्टील बार, इलेक्ट्रिक मोटार, गेअर फोर्जिंग असे एकूण सहा लाख ७६ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले

Material worth seven lakhs was stolen by stealing the letter from the company's shed | Pimpri Chinchwad : कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून पावणे सात लाखांचे साहित्य चोरीला

Pimpri Chinchwad : कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून पावणे सात लाखांचे साहित्य चोरीला

पिंपरी : अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटला. कंपनीत प्रवेश करून सहा लाख ७६ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. सोनवणे वस्ती, चिखली येथील ड्राईव्ह गेअर पावर ट्रान्समिशन या कंपनीत गुरुवारी (दि. १२) दुपारी चार ते शुक्रवारी (दि. १३) सकाळी साडेआठ या कालावधीत ही घटना घडली. 

प्रवीण शंकरराव ढाणे (५३, रा. चिखली प्राधिकरण) यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ढाणे यांची सोनवणे वस्ती, चिखली येथे ड्राईव्ह गेअर पावर ट्रान्समिशन नावाची कंपनी आहे. गुरुवारी दुपारी चार ते शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून कंपनीत प्रवेश केला. कंपनीमधून गेअर बॉक्स, इनव्हर्टर, स्टील बार, इलेक्ट्रिक मोटार, गेअर फोर्जिंग असे एकूण सहा लाख ७६ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक अमरदीप पुजारी तपास करीत आहेत.

Web Title: Material worth seven lakhs was stolen by stealing the letter from the company's shed