शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘मूँह बोला दाम’ आकारून मालामाल

By admin | Updated: April 18, 2017 02:58 IST

हिंजवडीतील आयटीयन्स शनिवार-रविवारची सुटी गाठून मूळ गावी जातात. त्यातच उन्हाळी सुटीच्या मुहूर्तावर सर्वत्र निघणारे लग्नसोहळे, धार्मिक कार्यक्रम, मूळ

वाकड : हिंजवडीतील आयटीयन्स शनिवार-रविवारची सुटी गाठून मूळ गावी जातात. त्यातच उन्हाळी सुटीच्या मुहूर्तावर सर्वत्र निघणारे लग्नसोहळे, धार्मिक कार्यक्रम, मूळ गावी सुट्या घालविण्यासाठीची लगबग या सर्वांची भर पडल्याने वाकड-हिंजवडीतील ट्रॅव्हल्स व्यावसायिक मूॅँह बोला दाम आकारून मालामाल होत असल्याचे वास्तव आहे. जगद्विख्यात आयटीपार्कमुळे हिंजवडी, वाकड, थेरगाव, ताथवडे भागात आयटीयन्स आणि बाहेरील नोकरदार वर्गाचे मोठे वास्तव्य, तसेच या भागात मोठ्या प्रमाणावर टुरिस्टरचे देखील प्रमाण वाढले आहे. गलेलठ्ठ पगार असणारा आयटीयन्स वर्ग वेळेत आणि आरामदायी प्रवासासाठी वाट्टेल तेवढे पैसे द्यायला तयार असतो; त्याचाच फायदा ट्रॅव्हल्सवाले घेत आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या स्पर्धेमुळे एजंटांचे देखील मोठे जाळे निर्माण झाले आहे. ते देखील या सिझनमध्ये बक्कळ नफा कमवीत आहेत. वर्षातील उन्हाळी, दिवाळी आणि शिमगा हे चार महिन्यांचे तीन सिझन त्यांना अत्यंत महत्त्वाचे असल्याने ट्रॅव्हल्स कंपन्यांनी १० एप्रिलपासून नियमित तिकिटांच्या किमतीत जवळपास ४० ते ५० टक्क्यांनी वाढ केली आहे. वाकड-हिंजवडी भागात बहुतेक आयटीयन्स पेइंग गेस्ट म्हणून राहतात. मात्र आयटी पार्क हिंजवडीला आठवड्यातून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुट्या असतात. या सुटीचे सोने करीत आयटीयन्स आपल्या घरी जातात. दर शुक्रवारी सायंकाळी येथील वाकड चौक, भूमकर चौक, शनी मंदिर चौक, भुजबळ चौक, ताथवडे या ठिकाणी आयटीयन्सचा लोंढाच पाहायला मिळतो. तासनतास येथील महामार्गावर आयटीयन्स बसची वाट पाहत ताटकळतात.