शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

लोकमत ऑन दि स्पॉट : महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा ठेकेदाराच्या भरवशावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 1:33 PM

मेट्रोच्या कामाकरिता वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्याचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे....

ठळक मुद्देसुरक्षारक्षक विनाहेल्मेट : सुरक्षेच्या साहित्यांसाठी मात्र वेतनातून कपातकुठल्याही साधनाशिवाय येथे काही कर्मचारी व सुरक्षारक्षक करतात काम

रजत खामकर - पिंपरी : शहरातील पिंपरी ते दापोडी या मार्गावर मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. काम सुरू असताना येथील जुन्या मुंंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक नियमन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे मेट्रो प्रशासनाने असल्याचे वास्तव समोर आले आहे. सुरक्षेच्या कुठल्याही साधनाशिवाय येथे काही कर्मचारी व सुरक्षारक्षक काम करत आहेत. त्यामुळे अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न कर्मचारी करत आहेत.   मेट्रोच्या कामाकरिता वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्याचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. या कंपनीतर्फे मेट्रो मार्गावर सुमारे १५० कर्मचारी नेमले आहेत. दोन शिफ्टमध्ये हे कर्मचारी विभागले आहेत. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण करणे व वाहनचालकांना योग्य दिशा दाखवण्याचे काम हे कर्मचारी करतात. वाहतुकीचे नियमन करत असताना काम सुरू असलेल्या मेट्रोच्या मार्गाखाली उभे राहूनच त्यांना नियमन करावे लागते. या कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी हेल्मेट तसेच सेफ्टी शूज नसल्याचे समोर आले आहे. सुरक्षेचे कोणतेच साधन नसल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे वाहतूक नियमन करणाºया कर्मचाºयांना हेल्मेट व सेफ्टी शूजची आवश्यकता आहे. तसेच ज्या मार्गावर काम चालू आहे तेथे संरक्षक जाळी बसवणे आवश्यक आहे. जेणेकरून मेट्रोच्या खालून प्रवास करणाऱ्या वाहनांवर व कर्मचाऱ्यांवर बांधकाम साहित्य पडणार नाही.मेट्रोकडून सुरक्षेचे साधने वापरण्यावर भर दिला आहे. मात्र, ज्या ठेकेदारांना हे काम दिले आहे. त्यांच्याकडून सुरक्षा साहित्यांची किंंमत (बुटासाठी ४०० रुपये) ही कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापून घेतली जाते. मात्र, साहित्य पुरविले जात नाही. त्यामुळे कर्मचारीही पैसे वाचवण्यासाठी हलक्या दर्जाचे बूट वापरतात. मात्र, एखादा अपघात झाल्यानंतर मेट्रो प्रशासन जागे होणार का, असा सवाल सुरक्षारक्षक करीत आहेत. तसेच, मेट्रो प्रशासनाकडे थेट तक्रार केल्यास ठेकेदार कामावरून काढण्याची भिती असल्याने कोणीही तक्रार करण्यास धजावत नाही. ..........महामेट्रो कंपनीने ज्या कंपनीला काम दिले आहे, त्या कंपनीने अतित मॅनेजमेंटला वाहतूक नियमन करण्याचे काम दिले आहे. आम्ही त्या कंपनीला सर्व सुरक्षा कर्मचारी आणि कामगारांना हेल्मेट व सुरक्षा बूट देण्यासंदर्भात सांगितले होते. त्यांना पुन्हा एकदा सांगण्यात येईल आणि सुरक्षा साहित्य सर्वांना पुरवण्यात येईल. - किशोर करंडे, वाहतूक आणि सुरक्षा प्रमुख, पुणे मेट्रो .......

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रो