शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
2
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
3
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
4
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
5
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
6
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
7
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
8
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
9
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
10
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
11
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
15
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
16
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
17
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
18
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
19
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
20
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
Daily Top 2Weekly Top 5

नद्या प्रदूषणमुक्तीला निधीचा 'खो'..! राज्याचा हिस्सा देण्यास स्पष्ट नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 15:39 IST

- पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ‘पीएमआरडीए’ची कोंडी : २९६८ कोटींच्या प्रकल्पासाठी निधीची कमतरता; ४० टक्के आर्थिक भार दोघांच्याही खांद्यावर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी आखण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना राज्य सरकारने आर्थिक मदत देण्यास सध्याच्या घडीला असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या ४० टक्के स्थानिक आर्थिक वाट्याचा संपूर्ण भार आता पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांनाच उचलावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्र सरकारच्या ‘नॅशनल रिव्हर कन्झर्वेशन’ योजनेंतर्गत पवना आणि इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्तीचा सविस्तर आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये मुख्यत्वे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. इंद्रायणी नदी प्रकल्पासाठी तब्बल १७९७ कोटी रुपये, तर पवना नदी प्रकल्पासाठी ११७१ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, एकूण २९६८ कोटी रुपयांचा हा आराखडा मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी केंद्र सरकार ६० टक्के निधी देणार असून, उर्वरित ४० टक्के निधी राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी उचलायचा आहे. या ४० टक्क्यांपैकी २० टक्के हिस्सा राज्य सरकारने उचलावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेने केली होती. त्यासाठी महापालिकेने नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाकडे २९ एप्रिल २०२६ रोजी प्रस्तावही पाठविला होता.

----------

प्राधिकरणाकडे तरतुदीची वानवा

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने हा प्रस्ताव फेटाळून लावत सध्या निधी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे. सहसचिव रमेश मनाळे यांनी पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाची स्थापना २७ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली असून, प्राधिकरणासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची प्रक्रिया अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे सध्या कोणतीही आर्थिक हमी देणे शक्य नाही. यामुळे आता पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ‘पीएमआरडीए’ यांना संयुक्तपणे उर्वरित ४० टक्के आर्थिक वाटा उचलावा लागणार आहे. आधीच आर्थिक ताणात असलेल्या स्थानिक संस्थांवर हा मोठा अतिरिक्त भार पडणार आहे.

---------

प्रकल्प खर्च किती?

इंद्रायणी नदी प्रकल्प : १७९७ कोटी

पवना नदी प्रकल्प : ११७१ कोटी

एकूण प्रकल्प खर्च : २९६८ कोटी

केंद्र सरकारचा हिस्सा : ६० टक्के

स्थानिक संस्थांवर पडणारा भार : ४० टक्के

‘पीएमआरडीए’ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या वतीने पवना व इंद्रायणीच्या प्रदूषणमुक्तीसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्र शासन ६० टक्के निधी देणार आहे. तसेच स्थानिक संस्थानी ४० टक्के निधी उपलब्ध करून हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाने याचा २० टक्के आर्थिक भार उचलावा, असा प्रस्ताव महापालिका आणि ‘पीएमआरडीए’ने दिला होता. तो निधी देण्यास राज्य शासनाने नकार दिला आहे. - संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, महापालिका

English
हिंदी सारांश
Web Title : River cleanup faces funding hurdle as state denies share.

Web Summary : Maharashtra declines funding for Pavana and Indrayani river cleanup. Pimpri-Chinchwad Municipal Corporation and PMRDA must bear the 40% cost. The central government will provide 60% funding for the project.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड