शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जिजामाता रुग्णालयप्रमुख, लिपिकाची उचलबांगडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 15:09 IST

दोन महिन्यांत १८ लाख ६६ हजार ३८८ रुपयांचा गैरव्यवहार

पिंपरी : जिजामाता रुग्णालयाच्या लेखा परीक्षणात दोन महिन्यांत १८ लाख ६६ हजार ३८८ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी जिजामाता रुग्णालयप्रमुख डॉ. सुनीता श्रीरंग साळवे व लिपिक आकाश प्रदीप गोसावी यांची बदली केली आहे. महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील रोजच्या भरणा रकमेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांनी केला होता. त्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली.जिजामाता रुग्णालयात रोजच्या रोज जमा होणाऱ्या भरणा रकमेत मोठा भ्रष्टाचार झाला. १ मार्च ते ३० एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत ९ लाख ७६ हजार ६९१ रुपयांची रक्कम जिजामाता रुग्णालय व महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हडप केली, असा आरोप काँग्रेसने केला होता.काय आहे प्रकरण?जिजामाता रुग्णालयात रोजच्या रोज जमा करण्यात येणाऱ्या रक्कम भरणाऱ्या रजिस्टरमध्ये अफरातफर झाली. रोजच्या रोज जमा होणारी भरणा रक्कम बँकेत न भरता अधिकाऱ्यांनी तिचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. रुग्णांकडून जमा होणारी रक्कम रोजच्या रोज न भरता नंतरच्या तारखेला भरण्यात आली. १ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये एकूण १८ लाख ६६ हजार ३८८ रुपये ३० दिवसांनी भरल्याचे लेखापरीक्षणात सिद्ध झाले आहे. आधीही गैरव्यवहारप्रकरणी कारवाईलेखापरीक्षणात डॉ. सुनीता साळवे व लिपिक आकाश गोसावी यांनी गैरव्यवहार केल्याचे आढळले. डॉ. साळवे यांच्यावर या आधीही मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी कारवाई झाली आहे. डॉ. साळवे यांची बदली यमुनानगर रुग्णालयाच्या प्रमुखपदी केली आहे. लिपिक आकाश गोसावी याची मुख्यालयात बदली केली आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCorruptionभ्रष्टाचार