'जपानच्या कंपनीला भारतात ऑफिस सुरु करायचंय', असं सांगून केली तब्बल २८ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 10:41 AM2021-09-01T10:41:59+5:302021-09-01T10:42:08+5:30

ओनो फार्मासिटिकल्स कंपनी लि. ओसाका, जपानचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, डिस्कवरी अँड रिसर्च असल्याचे आरोपीने त्यांना सांगितलं

'Japanese company wants to open office in India', he said | 'जपानच्या कंपनीला भारतात ऑफिस सुरु करायचंय', असं सांगून केली तब्बल २८ लाखांची फसवणूक

'जपानच्या कंपनीला भारतात ऑफिस सुरु करायचंय', असं सांगून केली तब्बल २८ लाखांची फसवणूक

Next
ठळक मुद्देचार कोटी अमेरिकन डॉलरच्या व्यवहारात मिळणार होते ७ टक्के कमिशन

पिंपरी : जपानच्या कंपनीला भारतात मिनरल खरेदीसाठी ऑफिस सुरू करायचं आहे. कंपनीचे भारतातील कामकाज पहा, असं सांगून माल खरेदी व इतर कारणांसाठी २७ लाख ९९ हजार ६३६ रुपये बँक खात्यावर घेऊन फसवणूक केली. महेशनगर, पिंपरी येथे ३ ते २३ जून २०२१ या कालावधीत ही घटना घडली. 

माधव सोपान ढमाले (वय ३९, रा. महेशनगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी मंगळवारी (दि. ३१) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. डॉ. तोईची तकिनो या झिंग सोशल मीडिया ॲपवरील प्रोफाइलधारक, मार्क डॉनल्ड ब्रिटन, महिला आरोपी, एचडीएफसी बँकेचा खातेधारक, पंजाब नॅशनल बँकेचा खातेधारक अरुणकुमार यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं झिंग सोशल मीडियावरून ढमाले यांना मेसेज पाठवला. ओनो फार्मासिटिकल्स कंपनी लि. ओसाका, जपानचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, डिस्कवरी अँड रिसर्च असल्याचे आरोपीने त्यांना सांगितलं. त्यांची कंपनी हेल्थ टेक्नॉलॉजी कंपनी असून त्या कंपनीला भारतात मिनरल खरेदीसाठी ऑफिस सुरू करायचं आहे. तुम्ही आमच्या कंपनीसाठी भारतातील कामकाज पाहण्यासाठी इच्छुक असाल तर आम्हाला कळवा, असंही तो म्हणाला. ढमालेंनी होकार दिल्यावर पी. के. एंटरप्रायजेस, शिलॉंग, मेघालय यांच्याकडून खनिज पदार्थ विकत घ्यायचा आहे.

आपण आमच्या कंपनीच्या वतीने पी. के. एंटरप्राईजेस या कंपनीशी व्यवहार पूर्ण करून घेण्यासाठी मध्यस्थीचे काम करा, असं आरोपीने सांगितले. पी. के. एंटरप्रायजेससोबत चार कोटी ५० लाख अमेरिकन डॉलर रकमेचा व्यवहार होणार आहे. त्याचे सात टक्के कमिशन आपणाला देण्यात येईल, असा एमओयू बनवून ई-मेल द्वारे त्यांना पाठवला. त्यानंतर वेळोवेळी माल खरेदी व इतर कारणांसाठी आरोपींनी बँक खात्यावर २७ लाख ९९ हजार ६३६ रुपये देण्यास सांगून ढमालेंची फसवणूक केली. फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक बडेसाब नायकवडे तपास करीत आहेत.

Web Title: 'Japanese company wants to open office in India', he said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.