शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पदविकाधारक अभियंत्यांवर अन्याय?

By admin | Updated: July 13, 2015 04:01 IST

महापालिकेतील पदविकाधारक अभियंत्यांवर पदोन्नती प्रक्रियेत अन्याय होत आहे, अशी तक्रार काही अभियंत्यांनी केली आहे. याबाबत राज्य शासनाच्या

पिंपरी : महापालिकेतील पदविकाधारक अभियंत्यांवर पदोन्नती प्रक्रियेत अन्याय होत आहे, अशी तक्रार काही अभियंत्यांनी केली आहे. याबाबत राज्य शासनाच्या निर्णयानुसार महापालिका प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.स्थापत्य आणि विद्युत विभागामध्ये असणाऱ्या अभियंत्यांपैकी दोनशे अभियंते पदविकाधारक आहेत. स्थापत्य अभियंता संवर्गाच्या उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता या पदासाठी पदोन्नतीचा विचार करताना पदवी आणि पदविकाधारक अशा दोन वेगवेगळ्या याद्या तयार केल्या जातात. त्यांच्या पदोन्नतीचे प्रमाण १:१ असे आहे. त्यामुळे पदविकाधारक अभियंत्यांवर अन्याय होत आहे. याबाबत पदविकाधारक अभियंत्यांनी नगरविकास सचिवांशी पत्रव्यवहार केला आहे. या विभागाने पालिकेकडे खुलासाही मागविला आहे. परंतु पालिकेचा खुलासा समर्थनीय नसल्याचे पत्र सरकारने पालिकेला दिले आहे. दोन वेगवेगळ्या याद्या तयार कराव्यात, असा आदेश दिला आहे. याबाबत राज्य सरकारच्या धोरणाचा अभ्यास करीत असून, त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आयुक्त राजीव जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)