शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

शेती विभागातील कर्मचारी महत्त्वाचा दुवा

By admin | Updated: September 2, 2015 03:59 IST

साखर कारखाना कार्यक्षेत्र व परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन करताना कर्मचारी ज्ञानाने परिपूर्ण असणे आवश्यक असते. प्रत्यक्ष शेतावर

अवसरी : ‘‘ साखर कारखाना कार्यक्षेत्र व परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन करताना कर्मचारी ज्ञानाने परिपूर्ण असणे आवश्यक असते. प्रत्यक्ष शेतावर काम करताना कर्मचाऱ्यांकडील माहिती काळानुरूप परिपूर्ण असणे आवश्यक असते. शेती विभागात काम करणारे कर्मचारी म्हणजे कारखाना व ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे,’’ असे प्रतिपादन प्रदीप वळसे पाटील यांनी केले. पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर कारखान्याच्या ऊस विकास विभागाने तयार केलेल्या आधुनिक ऊस शेती पुस्तिकेचे प्रकाशन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना दत्तात्रयनगर येथे शेतकरी विभागातील कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम भीमाशंकर साखर कारखाना व नेटाफिम इंडिया कंपनी यांच्या विद्यमाने झाला. यावेळी वरिष्ठ व्यवस्थापक अरुण देशमुख,चंद्रकांत ढगे, संचालक अशोक घुले, चंद्रकांत ढोबळे, ऊस विकास अधिकारी नारायण लगड, नेटाफिम कंपनीचे विशाल भालेराव, शैलेश दगडे उपस्थित होते. सहायक ऊस विकास अधिकारी दिनकर आवक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेतकरी अधिकारी अंकुश आढाव यांनी आभार मानले. (वार्ताहर)