'कोणाला सांगितले तर तुझ्या आईला व भावाला मारून टाकीन', पित्याचा पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 09:00 IST2022-06-23T09:00:36+5:302022-06-23T09:00:49+5:30

नराधम पित्याने मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस

If I tell anyone I will kill your mother and brother father sexually abuses daughter | 'कोणाला सांगितले तर तुझ्या आईला व भावाला मारून टाकीन', पित्याचा पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

'कोणाला सांगितले तर तुझ्या आईला व भावाला मारून टाकीन', पित्याचा पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी : नराधम पित्याने पोटच्या १४ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत घरात कोणालाही न सांगण्याची मुलीला धमकी दिली. काळेवाडी आणि हिंजवडी परिसरात ऑगस्ट २०२० ते २० जून २०२२ या कालावधीत ही धक्कादायक घटना घडली. पीडित मुलीच्या ३२ वर्षीय आईने याप्रकरणी मंगळवारी (दि. २१) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ३४ वर्षीय नराधम बापाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या १४ वर्षीय मुलीसोबत अश्लील वर्तन केले. मुलगी बापाचा हात झटकून घरातून बाहेर जात असताना आरोपी बापाने मुलीचे तोंड दाबून तिला घरात बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तू जर घरामध्ये कोणाला काहीही सांगितले तर तुझ्या आईला व भावाला मारून टाकीन, अशी धमकी दिली. पीडित मुलीवर आरोपीने वारंवार लैंगिक अत्याचार केला. २० जून रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी पुन्हा मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर फिर्यादी महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: If I tell anyone I will kill your mother and brother father sexually abuses daughter