"मी भोसरीचा भाई, मला हप्ता दे..." कापड दुकानदाराकडे मागितली खंडणी, तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 08:51 PM2023-07-14T20:51:11+5:302023-07-14T20:52:32+5:30

ही घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भोसरी येथे घडली...

"I am Bhosari's don, give me the installment..." Extortion demanded from cloth shopkeeper, case filed against three | "मी भोसरीचा भाई, मला हप्ता दे..." कापड दुकानदाराकडे मागितली खंडणी, तिघांवर गुन्हा दाखल

"मी भोसरीचा भाई, मला हप्ता दे..." कापड दुकानदाराकडे मागितली खंडणी, तिघांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

पिंपरी : ‘तुला माहीत नाही का मी भोसरीचा भाई आहे’, असे म्हणत कपड्याचे दुकान असलेल्या एका व्यावसायिकाकडे दुकानात येऊन तिघांनी खंडणी मागितली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. १३) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भोसरी येथे घडली.

पिल्या राक्षे (वय २३), करण राठोड (वय २५), पत्या ऊर्फ प्रथमेश कांबळे (वय २०, सर्व रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशन श्रीकृष्ण सिंग (वय २९, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सखुबाई गवळी गार्डन जवळ कपड्यांचे दुकान आहे. फिर्यादी हे त्यांच्या दुकानात असताना त्यांच्या तोंडओळखीचे आरोपी दुकानात आले. ‘इथे धंदा करायचा असेल तर आम्हाला हप्ते द्यायचे. फुकट कपडे द्यायचे’ असे बोलून पिल्या राक्षे याने कोयता काढून फिर्यादी यांना धाक दाखवला. ‘तुला माहिती नाही का, मी भोसरीचा भाई आहे. माझ्याकडे पैसे मागतोस’ असे म्हणून फिर्यादीच्या अंगावर कोयता मारण्यासाठी उगारला. फिर्यादी यांनी कोयत्याचा वार चुकवला. दरम्यान, त्यांचा मावस भाऊ मध्ये आला असता आरोपींनी त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, कोयता उगारून दहशत माजवत आरोपी निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींच्या दहशतीला घाबरून परिसरातील नागरिक सैरावैरा पळू लागले. तसेच, आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या दुकानांचे शटर बंद करून घेतले असल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: "I am Bhosari's don, give me the installment..." Extortion demanded from cloth shopkeeper, case filed against three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.