दुचाकीवरून जाणाऱ्या पती पत्नीला कंटेनरची धडक; पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 16:04 IST2023-06-23T16:03:55+5:302023-06-23T16:04:06+5:30
घटना गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता गोडाऊन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोशी येथे घडली

दुचाकीवरून जाणाऱ्या पती पत्नीला कंटेनरची धडक; पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
पिंपरी : पती पत्नी दुचाकीवरून जात असताना एका कंटेनरने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडली. त्यावेळी कंटेनरखाली चिरडून तिचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २२) सकाळी साडे दहा वाजता गोडाऊन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोशी येथे घडली.
सुभाष गुलाब पवार (वय ३५, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर (एमएच १४/इएम ७८७८) चालक व्यंकट दिगंबर दिवटेवाड (वय ३३, रा. घरकुल, चिखली. मूळ रा. लातूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी दुचाकीवरून जात होते. गोडाऊन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यात फिर्यादी यांची पत्नी दुचाकीवरून खाली पडल्या. कंटेनरखाली चिरडून फिर्यादी यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.