पिंपरी : हस्तलिखिताऐवजी संगणकीकृत सात-बारा देण्याचे नियोजित आहे. मात्र, अद्याप संगणकीकरणाचेच कामकाज पूर्ण झाले नसल्याने हवेली तालुक्यात ही सुविधा सुरू झालेली नाही. त्यामुळे येथील तलाठ्यांकडून अजूनही हस्तलिखितच सात-बारा दिले जात आहेत. नागरिकांना अनेकदा चालू सात-बाऱ्यांची आवश्यकता भासत असते. ही कागदपत्रे तातडीने हवी असतात. मात्र, कधी तलाठी भेटत नाहीत, तर कधी गर्दी असल्याने हवी असलेली कागदपत्रे वेळेत उपलब्ध होत नाहीत. यामुळे संबंधित नागरिकांना वारंवार तलाठी हेलपाटे माराव्या लागतात. यासह हस्तलिखित सात-बारा देताना अनेक अडचणी येतात. रेकॉर्ड शोधणे, त्यानंतर सर्व सात-बारा भरणे यांमध्ये बराचसा वेळही जातो.यावर उपाय म्हणून तलाठ्यांकडून लॅपटॉपवरील सात-बारा देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. यासाठी सात-बारांचे संगणकीकरण करण्याचे कामकाज तहसील कार्यालयात करण्यात आले. नव्याने येणाऱ्या नोंदीचा यामध्ये समावेश होता. संगणकावर फिड झालेली सात-बाराची माहिती तलाठी यांना दिल्यानंतर त्यांच्याकडील लॅपटॉपवर ही माहिती संकलित राहते. त्यामुळे तलाठी यांच्याकडील लॅपटॉपवरून मिळणाऱ्या सात-बाराच्या प्रतीवर केवळ त्यांची सही व शिक्का मारल्यानंतर संबंधिताला काही मिनिटांतच सात-बारा उपलब्ध होऊ शकतो. सर्वप्रथम मुळशी तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविण्यात आला. यानंतर तालुक्यात त्याची अंमलबजावणी सुरूही झाली असून, बहुतेक तलाठी कार्यालयांत संगणकीकृत सात-बारा दिले जात आहेत. यासह भोर तालुक्यातही अशाच प्रकारे सात-बारा देण्याचे कामकाज सुरू आहे. (प्रतिनिधी)
तलाठी देताहेत हस्तलिखित उतारा
By admin | Updated: July 28, 2015 00:51 IST
हस्तलिखिताऐवजी संगणकीकृत सात-बारा देण्याचे नियोजित आहे. मात्र, अद्याप संगणकीकरणाचेच कामकाज पूर्ण झाले नसल्याने हवेली तालुक्यात
तलाठी देताहेत हस्तलिखित उतारा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}