शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला मारहाण; दत्तनगरमध्ये तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2016 00:19 IST

पेट्रोल पंपावर डोक्यात दगड घालून रविवारी दत्तनगर येथील तरुणाचा खून केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी सोमवारी ११ आरोपींना अटक केली आहे. हल्ल्यात जीव गमावलेल्या विनायक पाटोळे

चिंचवड : पेट्रोल पंपावर डोक्यात दगड घालून रविवारी दत्तनगर येथील तरुणाचा खून केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी सोमवारी ११ आरोपींना अटक केली आहे. हल्ल्यात जीव गमावलेल्या विनायक पाटोळे याच्यावर अंत्यसंस्कार करून आल्यानंतर संतप्त जमावाने दत्तनगर येथे एका महिलेला मारहाण केली. पोलीस कर्मचाऱ्याने वेळीच धाव घेतल्याने तिला सुरक्षितस्थळी हलविणे शक्य झाले. या भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाच्या घटनेनंतर काही तासांतच इंदिरानगर झोपडपट्टीतून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. आकाश दांगडे ऊर्फ काकडी, तुषार ऊर्फ भाऊ मांजाळकर, किरण राठोड, शुभम साळुंके, महेश वीटकर, उमेश राठोड, अनिल ऊर्फ अन्नू पवार, राजू चव्हाण, करण धोत्रे, विकास राठोड ऊर्फ विंचू, राजेश पवार या आरोपींना अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्ल्यात ठार झालेल्या विनायक पाटोळे याचा मोहननगर परिसरात झालेल्या चेतन मोहिते याच्या खून प्रकरणात सहभाग होता. त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. अल्पवयीन असल्याने त्याला सुधारगृहात ठेवण्यात आले होते. सुधारगृहातून बाहेर आल्यानंतर त्याला पुन्हा गुन्हेगारीशी संबंधित मित्रांची संगत लाभली. दोन दिवसांपूर्वी संघवी केशरी महाविद्यालयाजवळ त्याचा करण धोत्रे या आरोपीबरोबर वादविवाद झाला होता. पप्या पवार आणि पाटोळे या दोघांनी धोत्रेला धक्काबुक्की केली होती.महाविद्यालयाजवळ झालेल्या भांडणानंतर दोन दिवसांनी चिंचवड स्टेशन येथील पेट्रोल पंपावर रविवारी दुपारी डोक्यात सिमेंटचे ब्लॉक मारून पाटोळे याचा खून करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून हा खून झाला, हे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. या घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशी (सोमवारी) दत्तनगरमध्ये उमटले. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पाटोळे याच्या घरासमोर दत्तनगर येथे चार दिवसांपूर्वीच भाड्याने राहण्यास आलेल्या साबीरा शेख या महिलेवरसुद्धा खुनी हल्ला झाला. पाटोळे याच्यावर अंत्यसंस्कार करून आलेल्यांमधील संतप्त जमावाने साबीरा शेख या महिलेच्या घरातील साहित्याची मोडतोेड केली. तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. माहिती मिळताच त्या ठिकाणी धावून गेलेल्या संतोष बाबर या पोलीस कर्मचाऱ्यामुळे त्या महिलेचे प्राण वाचले. प्रसंगावधान दाखविल्याने अनुचित घटना टळली.दरम्यान भर दिवसा खुनाची घटना घडल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरातील वाढती गुंडगिरी रोखण्यासाठी पोलिसांनी योग्य ती पाऊले उचलण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. तसेच पोलिसांचे मनुष्यबळ वाढविण्याचीही आवश्यकता आहेत. (वार्ताहर)संशयावरून महिलेला चोपआरोपींनी दगडाने ठेचून मारलेल्या विनायक पाटोळे याच्या घरासमोर चार दिवसांपूर्वी साबीरा शेख या महिलेने घर भाड्याने घेतले आहे. अगोदर ती इंदिरानगर झोपडपट्टीत राहत होती. पाटोळे याच्या खुनातील आरोपींपैकी एकाबरोबर या शेख कुटुंबाची ओळख आहे. आरोपींनी पाटोळे यांच्यावर हल्ला केला. त्याअगोदर ही महिला मोबाइलवर कोणाशी तरी संभाषण करत होती. पाटोळेच्या मागावर असलेल्या इंदिरानगरमधील आरोपींना तिनेच माहिती पुरवली असावी, असा संशय व्यक्त करून तिला मारहाण करण्यात आली असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी या भागात बंदोबस्त ठेवला आहे.