गुंतवणुकीच्या आमिषाने दहा लाखाची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 15:03 IST2019-01-16T15:02:09+5:302019-01-16T15:03:09+5:30
आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून गुंतवणुक केल्यास चांगला फायदा मिळेल, असे आमिष दाखवुन आरोपींनी फिर्यादीची दहा लाखांची फसवणुक केली.

गुंतवणुकीच्या आमिषाने दहा लाखाची फसवणूक
पिंपरी : आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून गुंतवणुक केल्यास चांगला फायदा मिळेल, असे आमिष दाखवुन आरोपींनी फिर्यादीची दहा लाखांची फसवणुक केली. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर गंगाराम हुलावळे (वय ६६, मयूर कॉलनी, कोथरुड ) यांनी फिर्याद दाखल केली आहे. दिगंबर ज्ञानदेव पाटील (वय प्राधिकरण, निगडी),प्रसाद कृष्णा (इंद्रायणीनगर, भोसरी) अशी आरोपींची नावे आहेत. चिखली येथील आराध्य डेव्हलपर्स नावाने युरू केलेल्या गृहप्रकल्पात गुंतवणुक करा, भविष्यात ही गुंतवणुक फायद्याची ठरेल. असे सांगून आरोपींनी संगनमताने फिर्यादीला सदनिकेसाठी रक्कम भरण्यासाठी सांगितले. फिर्यादीने दहा ला रूपये भरले. मात्र त्यांना सदनिका दिली नाही, शिवाय भरलेली रक्कमही परत केली नाही. त्यामुळे फिर्यादीने फसवणुकप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.