शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जगताप डेअरी चौकात उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर

By admin | Updated: October 1, 2016 03:40 IST

सांगवी ते किवळे बीआरटीएस मार्गावर जगताप डेअरी, साई चौक येथे होणाऱ्या वाहतूककोंडीच्या प्रश्नाबाबत पुण्यात घेण्यात आलेल्या बैठकीत या चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर

पिंपरी : सांगवी ते किवळे बीआरटीएस मार्गावर जगताप डेअरी, साई चौक येथे होणाऱ्या वाहतूककोंडीच्या प्रश्नाबाबत पुण्यात घेण्यात आलेल्या बैठकीत या चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर हे दोन्ही उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी मान्यता दिली आहे. पुण्यात झालेल्या या बैठकीला आमदार लक्ष्मण जगताप, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत पाटील, आशाराणी पाटील यासह सर्व अभियंते उपस्थित होते. महापालिकेने सांगवी ते किवळे या मार्गावर बीआरटीएस सुविधा सुरू केली आहे. पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी परिसरातून हा मार्ग जातो. हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड आणि रहाटणी परिसरात वास्तव्याला आहेत. दरम्यान, या कर्मचाऱ्यांसह येथील नागरिक सांगवी ते किवळे या बीआरटीएस मार्गावरील जगताप डेअरी, साई चौकातून हिंजवडीच्या दिशेने जातात. या चौकात चारही बाजूने रस्ते येत असल्यामुळे तेथे वाहतूककोंडी होते. त्यावर उपाय म्हणून साई चौकात उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. यासह साई चौकात उड्डाणपुलासोबतच ग्रेड सेपरेटरही उभारणे शक्य असल्याचे प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी सांगितले. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर हे दोन्ही उभारण्यास परवानगी दिली, अशी माहिती आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.(प्रतिनिधी)