शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

पिंंपरी-चिंंचवड एमआयडीसीतील साडेपाच हजार लघु उद्योजकांना लॉकडाऊनचा फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 15:08 IST

ऑटोइंजिनिअरिंगसह सर्वच क्षेत्रातील लाखो रोजगार धोक्यात 

ठळक मुद्देएमआयडीसीत उत्पादन बंद झाल्याने दररोज दीड हजार कोटींचे नुकसानसुमारे ३० हजार महिलांनादेखील एमआयडीसीत मिळतो रोजगारलॉकडाऊननंतर उद्योग सुरळीत सुरू होण्यास मोठा विलंब होणार असल्याबाबत चिंता व्यक्त

नारायण बडगुजर 

पिंंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनचा पिंंपरी-चिंंचवड एमआयडीसीतील साडेपाच हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना फटका बसला आहे. पाच लाख कामगारांना त्याची झळ पोहचत आहे. उत्पादन बंद झाल्याने दररोज दीड हजार कोटींचे नुकसान एमआयडीसीत होत आहे. परिणामी आॅटोइंजिनिअरिंंगसह सर्वच क्षेत्रातील लाखो रोजगार धोक्यात आहे. 

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे उद्योग बंद असतानाही कामगारांना पगार द्यावा लागत असल्याने उद्योजकांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. कामगारांचे हाल होत आहेत. अन्नधान्यासाठी त्यांना मदतीवर अवलंबून रहावे लागत आहे. कोरोना महामारीच्या भीतीने बहुतांश कामगार गावाकडे गेले. मात्र, असे असले तरी लाखो कामगार अद्याप शहरात आहेत. यातील काही कामगार निवारा केंद्रात आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतरही कोरोनाच्या भीतीने कामगार शहरात लवकर परतण्याचे टाळतील. मात्र, गावातही त्यांना पुरेसा रोजगार मिळणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुºहाड कोसळण्याची भीती आहे. तसेच पुरेसे व तंत्रकुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध होणार नसल्याने येथील लघुउद्योजकांची अडचण होणार आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत वाढवलेल्या लॉकडाऊननंतर उद्योग सुरळीत सुरू होण्यास मोठा विलंब होणार असल्याबाबत उद्योजकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

पिंंपरी-चिंंचवड एमआयडीसीत २२ ब्लॉक असून, शहरात पाच ते सहा हजारांवर उद्योग आहेत. यात बहुराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील सहाशे मोठे उद्योग, तर साडेपाच हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) आहेत. यात तंत्रकुशल, कुशल व अकुशल असे पाच लाखांवर कामगार काम करतात. यात सुमारे दोन लाख कामगार परराज्यांतील आहेत. यात अकुशल मोठ्या संख्येने आहेत. सुमारे ३० हजार महिलांनादेखील एमआयडीसीत रोजगार मिळतो. यात केवळ १० टक्के महिला कुशल आहेत.

कच्च्या मालाची आयात-निर्यातही लॉकडाऊन 

पिंपरी-चिंंचवड एमआयडीसीत एफ ब्लॉकमध्ये इलेक्ट्रॉनिक-इलेक्ट्रॉनिक उद्योगांचा झोन आहे. २५० ते ३०० लघुउद्योग या झोनमध्ये आहेत. वाहन उद्योगासाठी आवश्यक असलेल्या इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन होते. या वस्तूंचे काही भाग तसेच काही साहित्य चीन तसेच इतर देशांतून आयात करून त्याची जोडणी येथे केली जाते. तर काहींचे येथे उत्पादन होते. तसेच आॅटो इंजिनिअरिंगसाठीचे प्लॅस्टिक-फायबर व रबर कंपन्याही मोठ्या प्रमाणात आहेत. वाहनांसाठी प्लॅस्टिक, फायबर व रबरचे काही भाग या कंपन्यांमध्ये तयार केले जातात. त्याचप्रमाणे लहान-मोठ्या अडीचशेवर फोर्जिंग आहेत.

कामगारांचे पगार देण्यात अडचणी येत आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणून पगाराचे कामकाज करण्यासाठी उद्योजकांना तात्पुरते पास उपलब्ध करून द्यावेत. त्याची प्रक्रिया सुलभ व्हावी. उद्योग सावरण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे शासनाने पॅकेज जाहीर करून उद्योगांना आर्थिक मदत करावी.    - संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंंपरी-चिंंचवड लघुउद्योग संघटना.

बीएस-४ प्रणालीतील इंजिन असलेल्या वाहनांच्या विक्रीसाठी परवानगी देण्यात यावी. त्यामुळे येथील उद्योजकांना दिलासा मिळेल. एप्रिलमध्ये उद्योग बंद असल्याने मे महिन्यात कामगारांना पगार देता येणे अशक्य आहे. विशेष पगार सहाय्य योजना अंमलात आणून शासनानेच त्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे.    - अ‍ॅड. अप्पासाहेब शिंदे, अध्यक्ष, पिंंपरी-चिंंचवड चेंबर आॅॅफ इंडस्ट्रिज कॉमर्स सर्व्हिसेस अँड अ‍ॅग्रिकल्चर.

कोरोना महामारीमुळे औद्योगिक महामंदी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार जाणार आहे. व्याज व कर्ज हप्त्यांची पुनर्रचना करावी. त्यासाठी थकीत कर्जांना पुनर्वसन योजना अंमलात आणून २५ हजार कोटींचे पुनर्वसन पॅकेज उद्योगांना द्यावे. फूड प्रोसेसिंंग इंडस्ट्रिजला चालना देऊन उद्योगांना शासनाने संजीवनी द्यावी.    - गोविंंद पानसरे, अध्यक्ष, पुणे जिल्हा औद्योगिक विकास मंडळ.

बहुतांश कामगार त्यांच्या मूळगावी परतले आहेत. त्यांचेही पगार आॅनलाइन होत आहेत. हे कामगार गावाकडून लवकर परत येणार नसल्याने लॉकडाऊननंतरही एमआयडीसीत कामगारांची वानवा राहणार आहे. शहरात अडकलेले कामगार लॉकडाऊन संपण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांनी गावी जायची तयारी केली आहे.    - अभय भोर, अध्यक्ष, फोरम आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसिएशन.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMIDCएमआयडीसीbusinessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEmployeeकर्मचारी