आरटीई प्रवेशासाठी खोटा रहिवासी पुरावा; १८ पालकांवर गुन्हा, भुगावातील खळबळजनक प्रकार
By विश्वास मोरे | Updated: March 10, 2025 17:19 IST2025-03-10T17:19:01+5:302025-03-10T17:19:25+5:30
शिक्षण विभागाने केलेल्या छाननी मध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवर खोटी माहिती दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

आरटीई प्रवेशासाठी खोटा रहिवासी पुरावा; १८ पालकांवर गुन्हा, भुगावातील खळबळजनक प्रकार
पिंपरी : शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत पाल्यांच्या प्रवेशासाठी खोटी माहिती दिल्याप्रकरणी १८ पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाकडून ही कारवाई केली आहे. हा प्रकार जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत माताळवाडी भुगाव येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन चंद्रकांत भोसले (३४), खंडू दिलीप बिरादार (३३), रामकृष्ण तानाजी चोंधे (४०), सुमित सुरेश इंगवले (३४), विजय सुभाष जोजारे (३४), मंगेश गुलाब काळभोर (४३), रोहिदास मारुती कोंढाळकर (३६), श्रीधर बाबुराव नागुरे (३८), बाबासाहेब छबुराव रंधे (४०), विलास रामदास साळुंखे (३४), गणेश राजाराम सांगळे (३५), रुपेश बाळकृष्ण सावंत (३८), दिगंबर पंडित सावंत (४०), चंदन अंकुश शेलार (४४), कुंभराम सांगिलाल सुतार (३३), मंगेश झगुलाल गुरव (३३), विवेक जयवंत जोरी (३०), उमेश हिरामण शेडगे (४० ) अशी गुन्हा दाखल झालेल्या पालकांची नावे आहेत.
अशी केली फसवणूक
आरोपी पालकांनी त्यांच्या पाल्यांना आरटीई मधील प्रवेश घेण्यासाठी खोटा रहिवासी पुरावा सादर केला. शिक्षण विभागाने केलेल्या छाननी मध्ये हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवर खोटी माहिती दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.