शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वीज केबल दुरुस्ती कामास वेग

By admin | Updated: July 28, 2015 00:48 IST

पावसाळ्यात केबल आणि जोडणी बिघाड होऊन वीज जाऊ नये म्हणून वीज वितरण कंपनीतर्फे दुरुस्तीकाम केले जात आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जवळजवळ हे काम

पिंपरी : पावसाळ्यात केबल आणि जोडणी बिघाड होऊन वीज जाऊ नये म्हणून वीज वितरण कंपनीतर्फे दुरुस्तीकाम केले जात आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जवळजवळ हे काम पूर्ण झाले आहे. तरीही पहिल्या पावसात काही ठिकाणी केबल आणि ट्रान्फार्मरमध्ये बिघाड दिसून आले. ते काम त्वरित पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. पावसामुळे शॉर्टसर्किट होऊन काही भागांत वीज जात असल्याचे चित्र आहे. पाऊस आणि वाऱ्यामुळे अनेक भागांत तार तुटणे, तारांवर झाडांच्या फांद्या पडणे, शॉर्टसर्किट होणे, ट्रान्फार्मरमध्ये बिघाड होणे, असे फॉल्ट निर्माण होतात. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वीज गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. पाऊस आणि त्यात अंधार यांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या गैरसोयीमुळे तक्रारींचा आकडा वाढतो. नागरिकांच्या रोषाला वीज कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागते. दक्षता म्हणून पिंपरी आणि भोसरी वीज वितरण कंपनी क्षेत्रातील केबल, ट्रान्फार्मर, फिडर, उघड्या तारा आदींचे दुरुस्तीकाम केले गेले आहे. पहिल्या पावसानंतर काही भागांतील तारा तुटल्याने वीज खंडित होण्याचे प्रकार घडले. त्यामुळे काही भागांत एक ते दोन दिवस वीज गायब झाली होती. या फॉल्टचा शोध घेऊन ताबडतोब दुरुस्तीकाम पूर्ण केले गेले. या पद्धतीने पुन्हा स्थिती निर्माण होऊन वीज खंडित होऊ नये, यासाठी काही भागांतील देखभाल आणि दुरुस्ती काम वेगात केले जात आहे. पाऊस आणि वाऱ्यामुळे तारा तुटून किंवा इतर प्रकारे वीज खंडित होऊ शकते. असा भाग शोधून काढून त्या ठिकाणी प्राधान्याने दुरुस्तीकाम केले जात आहे. पहिल्या पावसामुळे उघड्या तारा आणि ट्रान्फार्मरच्या भोवती झाडांच्या फांद्या आणि वेली वाढल्या आहेत. त्यांची छाटणी केली जात आहे. खराळवाडी उपकेंद्रातील खराळवाडी आणि महापालिका भवन भागात शुक्रवारपासून वीज वारंवार खंडित होत होती. त्यामुळे या भागातील घरांमध्ये आणि कार्यालयांमध्ये विजेचा लपंडाव सुरू होता. याचा शोध वीज कर्मचाऱ्यांनी घेतला. पिंपरी चौकातील बॅँक आॅफ इंडियाजवळच्या एसटीच्या २२ हजार व्होल्ट पॉवरच्या केबलमध्ये फॉल्ट दिसून आला. त्याची दुरुस्ती शनिवारी दुपारी करण्यात आली. ताबडतोब तेथून जोड देऊन वीजप्रवाह पूर्ववत केला आहे. या भागात वीज गेल्याने दुसऱ्या बाजूने तेथे वीजपुरवठा दिला गेला होता. (प्रतिनिधी)