ट्रकच्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू; एमआयडीसी भोसरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 12:11 IST2023-05-26T12:10:32+5:302023-05-26T12:11:28+5:30

भरधाव ट्रकने ज्येष्ठ व्यक्तीला पाठीमागून जोरात धडक दिल्यानंतर गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला

Elderly cyclist dies in collision with truck Incidents at MIDC Bhosari | ट्रकच्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू; एमआयडीसी भोसरीतील घटना

ट्रकच्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू; एमआयडीसी भोसरीतील घटना

पिंपरी : भरधाव ट्रकच्या धडकेने सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी येथे बुधवारी (दि. २४) सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. 

महादेव गुंडाप्पा संगापुरे (वय ७५ रा. भोसरी), असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. बबन महादेव संगापुरे (वय ४५, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ट्रक चालक रमजान यासीन शेख (वय ३३, रा. निगडी) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडिल हे त्यांच्या सायकलवरून जात असताना आरोपी त्याच्या ताब्यातील टाटा ट्रक भरधाव वेगात घेऊन आला. त्यावेळी भरधाव ट्रकने महादेव संगापुरे यांना पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी होऊन महादेव संगापुरे यांचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे.
 

Web Title: Elderly cyclist dies in collision with truck Incidents at MIDC Bhosari