शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; चिंचवडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 15:29 IST2024-02-16T15:28:51+5:302024-02-16T15:29:26+5:30
मुलगा जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना ही दुर्दैवी घटना घडली

शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; चिंचवडमधील घटना
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना ही दुर्दैवी घटना घडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिली आहे. सार्थक कांबळे असं मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
या अपघातात सार्थकला जोराचा मार लागला, तातडीनं त्याला रुग्णालयात हलविण्यात आलं. पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आहे. चिंचवड पोलीस याप्रकरणी अधिकचा तपास करत आहेत.