पिंपरीत आठ लाखांची आॅनलाईन फसवणुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 14:59 IST2018-08-20T14:58:31+5:302018-08-20T14:59:22+5:30
वडिलांच्या नावे भविष्य निर्वाह पेन्शन फंडात असलेली रक्कम मिळण्यासाठी बँक खाते क्रमांक मागितला. वेळोवेळी आॅनलाईन व्यवहार करण्यास सांगून आरोपीने ७ लाख ९० हजार ४७ रूपयांची फसवणुक केली.

पिंपरीत आठ लाखांची आॅनलाईन फसवणुक
पिंपरी : वडिलांच्या नावे भविष्य निर्वाह पेन्शन फंडात असलेली रक्कम मिळण्यासाठी बँक खाते क्रमांक मागितला. वेळोवेळी आॅनलाईन व्यवहार करण्यास सांगून आरोपीने ७ लाख ९० हजार ४७ रूपयांची फसवणुक केली असल्याची फिर्याद निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. विकास सिताकांत साळस्तेकर (वय ६१,प्राधिकरण) यांनी निगडीपोलिसांकडे फिर्याद दिली आहे. स्नेहा सिंग, रूपा तोमर, राजू वर्मा, झा अशी आरोपींची नावे आहेत. एप्रिल २०१८ पासून ते ९ आॅगस्ट २०१८ या कालावधीत फिर्यादीला वेळोवेळी मोबाईलवर संपर्क साधून आॅनलाईन रक्कम भरण्यास भाग पाडले. वडिलांच्या नावे भविष्य निर्वाह पेन्शन फंडात ३ लाख १० हजार ९९० रुपये रक्कम जमा आहे. ही रक्कम परत मिळविण्यासाठी काही रक्कम भरण्यास भाग पाडले. त्यांची सुमारे आठ लाखांची फसवणुक केली. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर आवताडे अधिक तपास करत आहेत.