दुबई ट्रिप पडली २० लाखांना; गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा ५ जणांची फसवणूक

By नारायण बडगुजर | Published: May 22, 2024 06:26 PM2024-05-22T18:26:47+5:302024-05-22T18:27:27+5:30

संस्थेच्या नावाखाली लहान मुलांचे कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमात जो जिंकेल त्याला दुबईला जाण्याची संधी मिळेल, असे आमिष दाखवले

Dubai trip cost 20 lakhs Fraud of 5 persons on the pretext of investment | दुबई ट्रिप पडली २० लाखांना; गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा ५ जणांची फसवणूक

दुबई ट्रिप पडली २० लाखांना; गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा ५ जणांची फसवणूक

पिंपरी : लहान मुलांच्या कार्यक्रमात जो जिंकेल त्याला दुबईला ट्रिप, असे आमिष दाखवले. तसेच कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगत पाच जणांची २० लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केली. भोसरी येथील स्पाईस अप इव्हेन्ट अँड कास्टिंग संस्था येथे २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीतील हा प्रकार घडला.

माही उर्फ आरती मनोछा (वय ३२), रोहित मनोछा (३८, दोन्ही रा. दिल्ली), नीता राजधानकौल (५०, रा. वाघोली), मृदुल शर्मा (२९, रा. इंदोर), संजू नंदा (३०, रा. दिल्ली), यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुमताज जब्बार शेख (५२, रा. संजय पार्क, विमानतळ रस्ता, पुणे) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. २१) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पाईसअप इव्हेन्ट अँड कास्टिंग संस्था भोसरी या संस्थेचे पदाधिकारी तसेच व्यवस्थापक यांनी आपसात संगनमत करून संस्थेच्या नावाखाली लहान मुलांचे कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमात जो जिंकेल त्याला दुबईला जाण्याची संधी मिळेल, असे आमिष दाखवले. तसेच कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली फिर्यादी मुमताज यांच्याकडून एक लाख ३१ हजार रुपये, विशाल किसन जाधव (३२, रा. कसबा पेठ, पुणे) यांचे पाच लाख ७८ हजार रुपये, अंजून ओएज खान (३७, रा. खांडेवाडी, पुणे) यांच्याकडून दोन लाख २० हजार, अविनाश विठ्ठलराव शिंदे (रा. औंध) यांच्याकडून एक लाख ५० हजार, जगजीत सिंग (रा. मोशी) यांच्याकडून आठ लाख रुपये, अनुप्रिता उन्मेष पाटील (लक्ष्मीनगर, पुणे) यांच्याकडून एक लाख ६० हजार रुपये असे एकूण २० लाख ३९ हजार रुपये घेत फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक सुहास खाडे तपास करीत आहेत.

Web Title: Dubai trip cost 20 lakhs Fraud of 5 persons on the pretext of investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.