भंगाराच्या पैशांच्या वाटणीवरून वाद; पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून, पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 15:11 IST2026-01-19T15:06:22+5:302026-01-19T15:11:23+5:30

पहिल्या पतीचे निधन झाल्यावर पत्नीने पतीच्या भावावरून संसार थाटून राहण्यास सुरुवात केली होती

Dispute over distribution of scrap money; Wife murdered by throwing stones at her head, husband arrested | भंगाराच्या पैशांच्या वाटणीवरून वाद; पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून, पतीला अटक

भंगाराच्या पैशांच्या वाटणीवरून वाद; पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून, पतीला अटक

पिंपरी : भंगाराच्या पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादातून पतीने आपल्या पत्नीची काठीने मारहाण करून आणि डोक्यात दगड घालून हत्या केली. ही घटना शनिवारी (दि. १७) सकाळी म्हाळुंगे (ता. मुळशी) येथे उघडकीस आली. दत्ता काळुराम जगताप (वय ३०, रा. बेबड ओहळ, ता. मुळशी) याला अटक केली आहे. कुसुम वसंत पवार (३२), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुम यांच्या पहिल्या पतीचे निधन झाले. त्यांना तीन मुले आहेत. त्यानंतर कुसुम आणि त्यांच्या पतीचा भाऊ दत्ता हे दोघे पती-पत्नी म्हणून राहत होते. कुसुम आणि दत्ता हे भंगार जमा करणे, मासेमारी करणे अशी कामे करत होते. त्यांनी जमा केलेल्या भंगारच्या पैशांच्या कारणावरून वाद झाला. दत्ता याने पत्नी कुसुम यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने तिला काठीने डोक्यात, मानेवर आणि पोटावर मारहाण केली. ती खाली पडलेली असताना त्याने दगड उचलून तिच्या डोक्यात मारून तिला ठार केले. भांडण सोडवण्यास गेलेल्या फिर्यादीलाही संशयिताने काठीने मारून जखमी केले, ज्यामध्ये त्यांच्या हाताची बोटे फॅक्चर झाली आहेत.

Web Title : कबाड़ के पैसे पर झगड़ा: पत्नी की हत्या, पति गिरफ्तार

Web Summary : म्हालुंगे में कबाड़ के पैसे को लेकर विवाद के बाद एक पति ने अपनी पत्नी की हत्या कर दी। उसने उसे लाठी और पत्थर से पीटा। पति को गिरफ्तार कर लिया गया है; मामला दर्ज किया गया है।

Web Title : Quarrel Over Scrap Money: Wife Murdered, Husband Arrested

Web Summary : A husband in Mhalunge murdered his wife after a dispute over scrap money. He beat her with a stick and a stone. The husband has been arrested; a case has been filed.