शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पालखी मार्गावर धोकादायक गतिरोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2016 00:37 IST

संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ होण्यास जेमतेम सहा दिवस उरले असताना पालखी मार्गावरील व विविध पालखी तळांवर शासकीय स्तरावर विविध सोयी-सुविधा देण्याबाबत कार्यवाही सुरू झाली

देहूरोड : संत तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ होण्यास जेमतेम सहा दिवस उरले असताना पालखी मार्गावरील व विविध पालखी तळांवर शासकीय स्तरावर विविध सोयी-सुविधा देण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र, देहूरोडच्या लष्करी हद्दीत देहूगाव -देहूरोड रस्त्यावर गेल्या आठवड्यात बसविण्यात आलेल्या अशास्त्रीय गतिरोधकामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, तातडीने गतिरोधक काढून टाकण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच, चिंचोली येथील पालखीच्या पहिल्या विसाव्याच्या ठिकाणीगेल्या वर्षी खोदण्यात आलेले चर बुजविले नसल्याने भाविकांची गैरसोय होणार आहे. देहूगाव -देहूरोड पालखी मार्गावर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या व स्थानिक लष्कराच्या हद्दीत सीओडी डेपो ते पुणे-मुंबई महामार्गदरम्यान विविध ठिकाणी अशास्त्रीय गतिरोधक (डांबर व खडीच्या साह्याने) बनविण्यात आलेले आहेत. तसेच गेल्या आठवड्यात लष्करी हद्दीत दोन ठिकाणी कठीण रबराचे गतिरोधक बसविण्यात आले आहेत. त्यातील एक गतिरोधक काही ठिकाणी खिळे बाहेर येऊन खराबही झाला आहे. दुसराही खराब होण्याची शक्यता दिसत आहे. भारतीय रस्ते काँग्रेसच्या निकषाप्रमाणे कोणत्याही रस्त्यावर गतिरोधक बनविताना ठरावीक रुंदी व उंची ठेवणे बंधनकारक असते. तसेच गतिरोधकाच्या अगोदर ५० मीटर अंतरावर पुढे गतिरोधक असल्याचा मार्गदर्शक फलक लावणे आवश्यक असते. गतिरोधक दिसण्यासाठी पट्टे मारावे लागतात, जेणेकरून वाहने आदळून चालकांना अपघात होऊ नये, अगर आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये. हा त्यामागील मुख्य उद्देश असतो. मात्र, या ठिकाणी बनविण्यात आलेले गतिरोधक निकषाप्रमाणे बनविण्यात आलेले नाहीत. गतिरोधकांच्या अगोदर दोन्ही बाजूंना मार्गदर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. रात्रीच्या वेळी गतिरोधक दिसण्यासाठी रेडियम अगर ब्लिंकर लावणे गरजेचे असताना लावण्यात आलेले नाही. परिणामी, वाहने आदळून वाहनचालकांना पाठीच्या मणक्याचा व मानेला झटका बसण्याचे प्रकार घडत असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गतिरोधक दिसल्याने एखादे वाहन अचानक थांबल्याने दुसरे वाहन त्यावर आदळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. मंगळवारी येथून जाणारा पालखी रथ, दिंड्या व भाविकांची हजाराहून अधिक वाहनांना या गतिरोधकामुळे फटका बसण्याची शक्यता असून, संबंधितांना निकषानुसार नसलेले सर्व गतिरोधक तातडीने काढण्याबाबत सूचित करावे, अशी मागणी स्थानिकांतून व भाविकांतून करण्यात येत आहे. (वार्ताहर)