पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी वाढतीये; पुन्हा एकदा भरदिवसा गोळीबार, तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 17:01 IST2023-05-22T16:59:55+5:302023-05-22T17:01:14+5:30
पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली

पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी वाढतीये; पुन्हा एकदा भरदिवसा गोळीबार, तरुणाचा मृत्यू
पिंपरी : चिखली गावात भरदिवसा तरुणावर गोळीबार करण्यात आला. तरुणाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. सोन्य तापकीर असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली गाव येथे बस स्टॉपच्या जवळ रहदारीची ठिकाणी सोन्या तापकीर याच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. यात सोन्या गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणयात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मावळ तालुक्यातील उद्योजक किशोर आवारे यांची तळेगाव दाभाडे नगरपालिका कार्यालय समोर हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी गोळीबार करत तसेच कोयत्याने डोक्यावर वार केले. निपचीत पडल्यानंतरही हल्लेखोर आवारे यांच्यावर वार करत होते. मावळ परिसरामध्ये गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी वाढत आहे. जमिनींना सोन्याचा भाव आल्याने तसेच राजकीय वर्चस्वाच्या वादामध्ये खून आणले होण्याचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची तळेगाव मध्ये निघृणपणे हत्या करण्यात आली होती.