Crime News: पिंपरीत आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:27 IST2026-04-15T15:27:08+5:302026-04-15T15:27:51+5:30

Crime News - संशयिताने आंब्याचे आमिष दाखवून चिमुरडीला खोलीत बोलावून घेतले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

Crime News Two and a half year old girl raped in Pimpri by luring her with mango | Crime News: पिंपरीत आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

Crime News: पिंपरीत आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात अडीच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना काळेवाडी येथे सोमवारी (दि. १३ एप्रिल) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी पीडित चिमुरडीच्या आईने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी विजय भोसले (वय ४७, रा. काळेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने आंब्याचे आमिष दाखवून चिमुरडीला खोलीत बोलावून घेतले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.


 

घटनेची माहिती मिळताच चिमुरडीच्या आईने तात्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, पुढील तपास काळेवाडी पोलीस करत आहेत.

Web Title : पिंपरी: ढाई साल की बच्ची को आम का लालच देकर यौन उत्पीड़न

Web Summary : पिंपरी में एक ढाई साल की बच्ची के साथ यौन उत्पीड़न की चौंकाने वाली घटना सामने आई। आरोपी विजय भोसले ने बच्ची को आम का लालच देकर कमरे में बुलाया और अपराध किया। पुलिस ने मां की शिकायत पर भोसले को गिरफ्तार किया; जांच जारी है।

Web Title : Pimpri: Two-and-a-half-year-old girl sexually assaulted after lure of mango.

Web Summary : In Pimpri, a shocking incident occurred where a two-and-a-half-year-old girl was sexually assaulted. The accused, Vijay Bhosle, lured the girl with mangoes into a room and committed the crime. Police arrested Bhosle following the mother's complaint; investigation underway.